

वसई : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार वसई-विरार शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी आरक्षण प्रक्रियेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरी मागासवर्ग प्रवर्ग, नागरी मागासवर्ग प्रवर्ग (महिला) आणि सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी प्रभाग आरक्षण निश्चित करण्याची सोडत मंगळवार, ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता महानगरपालिका वसई-विरार मुख्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर, विरार (पश्चिम) येथे खुल्या पद्धतीने काढण्यात येणार आहे. महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीतील हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार असून, प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीनंतर शहराचे निवडणूक चित्र अधिक स्पष्ट होणार आहे. नागरिक आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना प्रत्यक्ष उपस्थित राहून सोडत प्रक्रिया पाहण्याची संधी उपलब्ध असेल.
१७ ते २४ नोव्हेंबरदरम्यान सूचनांसाठी संधी
आरक्षणाचे प्रारूप सोमवार, १७ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केले जाईल. या प्रारूपावर नागरिकांना १७ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत हरकती व सूचना सादर करण्याची संधी उपलब्ध असेल. हरकती प्रत्यक्ष सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उल्हासनगर महापालिका निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर शहराचे राजकीय स्वरूप बदलविणाऱ्या महत्त्वपूर्ण आरक्षण निवडणुकीतील निर्णायक टप्पा ठरणारी ही सोडत मंगळवार, ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता खुल्या पद्धतीने काढण्यात येणार सोडतीची घोषणा आहे. ही सोडत शहीद जनरल करण्यात आली आहे. कोणते अरुणकुमार वैद्य सभागृह (टाऊन प्रभाग अनुसूचित जाती, अनुसूचित हॉल), उल्हासनगर-३ येथे होईल. जमाती, मागासवर्गीय तसेच अनुसूचित जाती (महिला), सर्वसाधारण महिलांसाठी राखीव अनुसूचित जमाती (महिला), ठरणार याबाबत नागरिकांमध्ये नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग मोठी उत्सुकता असून, (महिला) तसेच सर्वसाधारण महापालिकेने संपूर्ण प्रक्रिया महिला या प्रवर्गासाठी प्रभाग पारदर्शक पद्धतीने जाहीर केली आरक्षण निश्चित केले जाणार आहे. महापालिकेच्या सार्वत्रिक आहे.
सोडत आणि आरक्षण प्रक्रियेत पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यावश्यक आहे. सर्वांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून आणि निर्धारित कालावधीत आपापल्या हरकती व सूचना नोंदवाव्यात.
मनीषा आव्हाळे, आयुक्त उल्हासनगर महापालिका