Pune : कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीत मनसेचा पाठिंबा कोणाला? वसंत मोरेंच्या भूमिकेमुळे राज ठाकरेंची कोंडी?

पुणे (Pune) पोटनिवडणुकीमध्ये मनसेची भूमिका काय असणार हे अद्याप स्पष्ट झाले नसून मनसे नेते वसंत मोरे यांच्या फेसबुक पोस्टमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत
Pune : कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीत मनसेचा पाठिंबा कोणाला? वसंत मोरेंच्या भूमिकेमुळे राज ठाकरेंची कोंडी?

आज कसबा पेठ (Kasaba By-Election) आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (Chinchwad By-Election) अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज कोणते नेते आपला अर्ज मागे घेणार? याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. तर, दुसरीकडे मनसेने (MNS) या निवडणुकीत आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, राज ठाकरे (Raj Thackeray) हे लवकरच आपली भूमिका स्पष्ट करणार असून ते भाजपला (BJP) पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशामध्ये पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे (Vasant More) यांची एक फेसबुक पोस्ट चांगलीच गाजत आहे. कारण, यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना, 'विधानसभेची निवडणूक होते, मग महापालिकेची का नाही?' असा सवाल केला आहे. यामुळे आता राज ठाकरेंची कोंडी झाल्याचे सांगितले जात आहे.

पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे हे फेसबुक पोस्टमध्ये म्हणाले आहे की, "माझा शिंदे- फडणवीस सरकारला एक प्रश्न आहे. नुकतेच कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड शहरातील भाजपच्या २ आमदारांचे निधन झाले. अजून त्यांच्या सरणाची राख निवली सुद्धा नसेल, तर तुम्ही तुमची मते कमी होतील म्हणून लगेच त्या त्या ठिकाणी निवडणुका घेतल्या. मग गेल्या वर्षभरापासून आमच्या शहराला कोणताही लोकप्रतिनिधी (नगरसेवक) नाही, प्रशासनाने शहराचे वाटोळे लावले आहे. एवढाच नव्हे तर, विकास कामे ठप्प झाली असून निधी नसल्यामुळे नागरिकांना थोबाड दाखवू वाटत नाही. मग तुम्ही अजून पालिका निवडणूक का घेतली नाही?" असा सवाल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

एखाद्या पदाधिकाऱ्याच्या घरी जाऊन बैठक घेऊ, शहर कार्यालय सोडून कुठेही बैठकीला येण्यास तयार - वसंत मोरे

पुढे ते म्हणाले आहेत की, "पुण्यातील आमदार आणि खासदारांनी जरा आमच्या चपलेत पाय घालून बघावे. जर कोणत्या पक्षाला सहनुभुती मिळेल म्हणून जर निवडणुका टाळत असाल तर तुमचा पराभव निश्चित समजा कारण जो मनातून हारतो तो रणात काय जिंकणार?" असा इशारा त्यांनी शिंदे - फडणवीस सरकारला दिला आहे. त्यांच्या या पोस्टमुळे आता भाजपची चिंता वाढली आहेच, शिवाय राज ठाकरेही यामुळे कोंडीत सापडले आहेत. वसंत मोरे हे पुण्यातील मोठे नाव असून अनेकदा मनसेमध्ये ते नाराज असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in