कोलकाता नाईट रायडर्स संघाचा दिग्गज वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स आयपीएलमधून बाहेर

कोलकाता नाईट रायडर्स  संघाचा दिग्गज वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स आयपीएलमधून बाहेर

आयपीएलचा पंधरावा हंगाम निर्णायक टप्प्यात आलेला असतानाच कोलकाता नाईट रायडर्स संघाचा दिग्गज वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स आयपीएलमधून बाहेर पडला आहे. कंबरेला दुखापत झाल्याने आरामाची गरज असल्याचे दांगत त्याने हा निर्णय घेतला. कमिन्स ऑस्ट्रेलियमध्ये त्याच्या घरी म्हणजेच सिडनीमध्ये परणार आहे.

कोलकाता नाईट रायडर्स संघाची प्ले ऑफर्यंत पोहोचण्याची शक्यता खूपच कमी आहे. असे असले तरी हा संघ उर्वरित सामने पूर्ण ताकतीनिशी खेळणार आहे. असे असतानाच कमिन्स संघातून बाहेर पडला आहे.

काही दिवसांपूर्वी त्याच्या कंबरेला दुखापत झाली होती. याच कारणामुळे आराम करण्यासाठी त्याने हा निर्णय घेतला आहे. आगामी काळात ऑस्ट्रेलियमध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. यामुळेदेखील कमिन्सला पूर्णपणे तंदुरुस्त होणे गरजेचे आहे. त्यामुळे त्याने आता आराम करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, या हंगामात पॅट कमिन्सची कामगिरी लौकिकाला साजेशी झाली नाही. त्याने ५ सामन्यांमध्ये फक्त ७ विकेट्स घेतल्या. फलंदाजीमध्ये त्याने काही प्रमाणात चांगली कामगिरी केली. मुंबईविरुध्दच्या सामन्यात त्याने अर्धशतक झळकावून कोलकाताला विजय मिळवून दिला होता.

logo
marathi.freepressjournal.in