बेपर्वाईचे बळी पर्यटनस्थळ म्हणजे आनंद लुटण्याची जागा

समुद्र किनारी व चौपाट्यांवर पालिका व स्थानिक पोलिसांनी कठोर नियम करणे गरजेचे
बेपर्वाईचे बळी पर्यटनस्थळ म्हणजे आनंद लुटण्याची जागा

मुंबई : गेल्या काही वर्षांत समुद्रकिनारी, चौपाट्यांवर अतिउत्साही पर्यटकांच्या जीवावर बेतल्याच्या घटना घडल्या आहेत. समुद्र किनारी, चौपाट्यांवर दरवर्षी पावसाळ्यात पालिका व स्थानिक पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात येते. समुद्रात खोल पाण्यात जाऊ नये, अशी अनाउन्समेंट केली जाते; मात्र काही अतिउत्साही पर्यटक पोलीस, लाईफ गार्डच्या नजरा चुकवून खोल पाण्यात जातात आणि जीवाला मुकतात. एकूणच समुद्र किनारी, चौपाट्यांवर पालिका व स्थानिक पोलिसांकडून कठोर अंमलबजावणी होत नसून, पुढे धोका हे दिसत असताना दुर्लक्ष करणे हे बेपर्वाईचे बळी पडतात हेही तितकेच खरे

पर्यटन स्थळे म्हटले की, पावसाळ्यात पर्यटकांची गर्दी होणे सहाजिकच आहे. परंतु आता परिस्थिती उलटली असून, पर्यटक दारू पिऊन धिंगाणा घालतात, असे चित्र चौपाट्यांवर व धबधब्याच्या ठिकाणी पहावयास मिळते. मुंबईत धबधबे नसले, तरी समुद्र किनारे, चौपाट्या आहेत. मुंबईत देशातील नव्हे, तर विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने पर्यटनस्थळांना भेट देतात. त्यामुळे विशेष करून पावसाळ्यात या ठिकाणी कठोर कारवाईची अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे. पावसाळ्यात समुद्र किनारी, चौपाट्यांवर पर्यटकांची तोबा गर्दी होते. समुद्रात उसळणाऱ्या उंच लाटांचा धोका लक्षात घेत, समुद्र किनारी जाणे टाळा, असे आवाहन पालिका व पोलिसांच्या वतीने केले जाते. तरीही काही अतिउत्साही पर्यटक पोलीस व लाईफ गार्डची नजर चुकवून समुद्राच्या आत जाण्याचे धाडस दाखवतात अन् जीव गमावतात. पावसाळ्यात समुद्र किनारी, चौपाट्यांवर बुडून मृत्यू होण्याच्या घटना टाळण्यासाठी योग्य ते नियोजन पालिका व स्थानिक पोलिसांनी करणे अपेक्षित आहे. तर सूचनांकडे नजर अंदाज करणारे पर्यटक जीव गमावतात, हे गेल्या काही वर्षांतील घटनांमुळे समोर आले आहे. त्यामुळे समुद्र किनारी व चौपाट्यांवर पालिका व स्थानिक पोलिसांनी कठोर नियम करणे गरजेचे असून सूचनेचे पालन न करणारे पर्यटक बेपर्वाईचे बळी पडतात, यात दुमत नाही

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in