PETA India ने शेअर केला चीनचा हेर समजून पकडलेल्या कबुतराच्या सुटकेचा Video

चीनचा हेर समजून पकडण्यात आलेल्या कबुतराची आठ महिन्यांच्या अटकेनंतर बुधवारी निर्दोष मुक्तता करण्यात आल्यानंतर आता 'पेटा इंडिया'ने त्याच्या सुटकेचा व्हिडिओ शेअर केला आहे.
PETA India ने शेअर केला चीनचा हेर समजून पकडलेल्या कबुतराच्या सुटकेचा Video

चीनचा हेर समजून पकडण्यात आलेल्या कबुतराची आठ महिन्यांच्या अटकेनंतर बुधवारी निर्दोष मुक्तता करण्यात आल्यानंतर आता 'पेटा इंडिया' या प्राणी सुरक्षा संस्थेने त्या कबुतराच्या सुटकेचा व्हिडिओ जारी केला आहे. एक्स या प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ शेअर करताना, पेटा इंडिया बाई सकराबाई दिनशॉ पेटीट हॉस्पीटल (BSDPHA) ने पक्ष्याची काळजी घेतल्याबद्दल आभार व्यक्त करते आणि रूग्णालयाला तातडीने परवानगी देऊन आणि पक्ष्याला मुक्त करण्यात मदत केल्याबद्दल आरसीएफ पोलिस स्टेशनचे देखील कौतुक करते असे म्हटले आहे.

गेल्या मे महिन्यामध्ये चेंबूर उपनगरातील पीर पौ जेट्टीमध्ये एक कबुतर पकडण्यात आले होते. त्याच्या एका पायात तांब्याचे तर दुसऱ्या पायात अॅल्युमिनिअमचे वळे होते. तसेच कबुतराच्या पंखाच्या आतल्या बाजूस चिनी अक्षरात काही संदेश लिहिण्यात आले होते. आरसीएफ पोलिसांनी या कबुतराला ताब्यात घेतले. संदेश पाहून हे कबुतर चिनी हेर असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यांनी ते कबुतर परेल येथील बार्इ सकराबार्इ दिनशॉ पेटीट हॉस्पीटल या पशुप्राण्यांच्या रुग्णालयात कोठडीत ठेवले. आरसीएफ पोलिसांनी याबाबत खटला दाखल करुन तपास केला. तेव्हा हे कबुतर तैवानमधील असल्याचे आढळले. तैवानमध्ये हे कबुतर शर्यतीसाठी वापरले जात होते. ते भरकटून भारतात आले होते. याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी कबुतराला सोडून देण्याची सूचना केली. त्यानुसार बुधवारी या कबुतराची निर्देाष मुक्तता करण्यात आली. कबुतर सोडतांना त्यांची तब्येत उत्तम असल्याची खात्री करुन घेण्यात आली.

logo
marathi.freepressjournal.in