

मुंबई : भारतीय रेल्वे यांत्रिक अभियांत्रिकी सेवा (आयआरएसएमइ) १९८८ बॅचचे अधिकारी आणि मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विजय कुमार गुप्ता यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. रोजच्या वेळेत झोपेतून न उठल्याने त्यांना जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विजय कुमार हे भारतीय रेल्वे अभियंता सेवेच्या १९८८ च्या बॅचचे अधिकारी होते.
विवेक कुमार गुप्ता यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार
विजय कुमार गुप्ता यांच्या निधनानंतर विवेक कुमार गुप्ता यांच्याकडे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक म्हणून पदभार स्वीकारण्यात आला आहे. भारतीय रेल्वे अभियंता सेवेच्या १९८८ च्या बॅचचे अधिकारी विवेक कुमार गुप्ता हे सध्या पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक म्हणून काम पाहत आहेत. यापूर्वी, ते नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक होते.