विक्रोळी, कर्नाक उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात; मुंबईकरांच्या सेवेत दोन्ही पूल लवकरच दाखल होणार

मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला व पी. डि'मेलो मार्गाला जोडणारा कर्नाक उड्डाणपूल तसेच मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपूल या दोन्ही प्रकल्पांची कामे आता अंतिम टप्प्यात आली आहे. विक्रोळी मे अखेरपर्यंत तर कर्नाक जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरू करण्याचे पालिकेच्या पूल विभागाचे नियोजन आहे.
विक्रोळी, कर्नाक उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात; मुंबईकरांच्या सेवेत दोन्ही पूल लवकरच दाखल होणार
Published on

मुंबई : मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला व पी. डि'मेलो मार्गाला जोडणारा कर्नाक उड्डाणपूल तसेच मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपूल या दोन्ही प्रकल्पांची कामे आता अंतिम टप्प्यात आली आहे. विक्रोळी मे अखेरपर्यंत तर कर्नाक जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरू करण्याचे पालिकेच्या पूल विभागाचे नियोजन आहे. मात्र वाहतूक विभागासमवेत समन्वय साधून लवकरच हे दोन्ही पूल वाहतुकीस खुले करण्याची तारीख निश्चित केली जाणार आहे. हे पूल सेवेत आल्यावर मुंबईतील दळणवळणाला अधिक गती मिळणार आहे.

मुंबई महानगरातील वाहतूक सुरळीत राहावी या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत महानगरात विविध रस्त्यांवर उड्डाणपूल, रेल्वे मार्गावर उड्डाणपूल, पादचारी पूल, आकाश मार्गिका आदींची उभारणी करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या पूल विभागाने काही नवीन पुलांचे बांधकाम केले आहे तर आणखी काही पुलांच्या बांधणीची कामे प्रगतिपथावर आहेत. त्यात कर्नाक रेल्वे उड्डाणपूल आणि विक्रोळी रेल्वे उड्डाणपुलाचा देखील समावेश आहे. अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी पूल विभागाच्या समन्वयाने कर्नाक पूल आणि विक्रोळी पूल या दोन्हीही पुलांची उभारणी, स्थापत्य कामे व अनुषंगिक कामांची कालमर्यादा निश्चित केली आहे. या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून कामांना अधिक वेग आला आहे. अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी गुरुवारी रात्री कर्नाक पूल प्रगतीचा आढावा घेतला.

मध्य रेल्वेने धोकादायक घोषित केलेल्या कर्नाक पुलाची पुनर्बांधणी बृहन्मुंबई महानगरपालिकेने केली आहे. मशीद बंदर परिसरात पूर्व आणि पश्चिम परिसर जोडणारा विद्यमान मार्ग कायम ठेवण्यासाठी या पुलाची पुनर्बांधणी करण्यात आली आहे. पुलाची लांबी रेल्वेच्या हद्दीत ७० मीटर तर पूर्व बाजूला (पी डि'मेलो मार्ग) १५५ मीटर, पश्चिम बाजूला (मोहम्मद अली मार्ग) २५५ मीटर आहे.

कर्नाक पुलाच्या दोन्ही बाजूंचे पोहोच मार्ग पूर्ण झाले आहेत. पश्चिमेकडील डेक स्लॅबचे काम देखील पूर्ण झाले आहे. पूर्व बाजूकडील ८० पैकी ४० मीटर लांबीच्या डेक स्लॅबचे काम पूर्ण झाले असून त्याचा क्युरिंग कालावधी सुरू आहे. उर्वरित ४० मीटर अंतरासाठी “अर्ली स्ट्रेन्थ काँक्रिट” चा वापर करण्यात आला आहे. यामुळे ५ जूनपर्यंत क्युरिंग कालावधी पूर्ण होईल. रेल्वे हद्दीत अँटी क्रॅश बॅरियर्स बसवण्याचे काम सुरू आहे.

विक्रोळी पूल

लांबी : ६१५ मीटर

रुंदी : १२ मीटर

सुधारित अंदाजित खर्च : ₹१०४ कोटी

काम वाढवण्यात आलेल्या तारखा : मार्च २०२१, मे २०२२ (कोविडमुळे), ऑक्टोबर २०२२, मे २०२३

नवीन अंतिम मुदत : मे २०२५

कर्नाक बंदर पूल

रेल्वे हद्दीत : ७० मीटर

पुलाचा पूर्वेकडील भाग (पी. डी’मेलो रोड) : १५५ मीटर

पश्चिमेकडील भाग (मोहम्मद अली रोड) : २५५ मीटर

पुलाचा खर्च : ₹४९ कोटी

मूळ मुदत : जून २०२४

नवीन मुदत : मे २०२५

logo
marathi.freepressjournal.in