तात्पुरत्या रुग्णालयासाठी विक्रोळीकरांची दमछाक; ज्योतिबा फुले रुग्णालयाच्या पुनर्विकासाची प्रतीक्षा

विक्रोळीकरांसाठी तात्पुरते रुग्णालय सुरू करा, अशी मागणी विक्रोळीकरांनी पालिका आयुक्त व मुख्यमंत्र्यांकडे केली
तात्पुरत्या रुग्णालयासाठी विक्रोळीकरांची दमछाक; ज्योतिबा फुले रुग्णालयाच्या पुनर्विकासाची प्रतीक्षा

मुंबई : विक्रोळीतील क्रांतिवीर महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालयाचा पुनर्विकास होणार आहे. यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे. मात्र रुग्णालय उभारून रुग्णांच्या सेवेत येईपर्यंत पाच वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे याठिकाणी रुग्णांच्या उपचारासाठी पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी पाच वर्षांपासून होत आहे; मात्र यावर अद्याप निर्णय न झाल्याने विक्रोळीकरांची दमछाक होत आहे. त्यामुळे विक्रोळीकरांसाठी तात्पुरते रुग्णालय सुरू करा, अशी मागणी विक्रोळीकरांनी पालिका आयुक्त व मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

फुले रुग्णालयाची इमारत धोकादायक ठरल्याने २०१८ मध्ये ते बंद करण्यात आले आहे. या भागातील पालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे; मात्र त्या रुग्णालयावर आधीच ताण असल्याने या भागातील नागरिकांची गैरसोय होत आहे. घाटकोपर कांजूर, भांडुपपासून सुमारे आठ ते दहा लाखांची लोकवस्ती असलेल्या भागात दुसरे मोठे रुग्णालय नसल्याने नागरिकांना घाटकोपर, कुर्ला, शीव येथील पालिका रुग्णालयांत जावे लागते आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in