विक्रोळीच्या डॉ. आंबेडकर रुग्णालयात आग

सहा रुग्णांना तेथील अतिदक्षता विभागातून त्वरेने हलविण्यात आले.
विक्रोळीच्या डॉ. आंबेडकर रुग्णालयात आग
Published on

मुंबई : विक्रोळीच्या टागोरनगरातील महापालिकेच्या डॉ. आंबेडकर रुग्णालयात रविवारी पहाटे १.४७ वाजता आग लागली. त्यामुळे तेथील सहा रुग्णांना तेथील अतिदक्षता विभागातून त्वरेने हलविण्यात आले.

रुग्णालयाची ही इमारत तीन मजली असून इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या आयसीयूमधील एअर सक्शन मोटरच्या मुख्य केबलला ही आग लागली होती, असे अधिकाऱ्याने सांगितले. खबरदारीचा उपाय म्हणून, चार ज्येष्ठ नागरिकांसह सहा रुग्णांना डॉक्टरांच्या उपस्थितीत आयसीयू वॉर्डमधून जवळच्या अपघाती वॉर्डमध्ये हलवण्यात आले, असे त्या अधिकाऱ्याने सांगितले. यापैकी दोन रुग्ण दाखल केले तेव्हा आधीच गंभीर होते. त्यांना नंतर घाटकोपर परिसरातील राजावाडी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. इतर चार रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांना आंबेडकर रुग्णालयात वैद्यकीय सेवा पुरवली जात असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. पहाटे २.२५ पर्यंत आग विझवण्यात आली, असे त्यांनी सांगितले. आगीच्या कारणाचा तपास सुरू होता.

logo
marathi.freepressjournal.in