७० वर्षांनंतर तरईतील गावकऱ्यांना मिळणार पूल; मुंबई पालिका तब्बल ३६ कोटी रुपये खर्च करणार

७० वर्षांनंतर तरईतील गावकऱ्यांना मिळणार पूल; मुंबई पालिका तब्बल ३६ कोटी रुपये खर्च करणार

मुंबईपासून १२० किलोमीटर अंतरावरून मुंबईला सात धरणांतून पाणीपुरवठा केला जातो. मुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठी जलवाहिन्यांचे जाळे विस्तारणे गरजे होते.

मुंबई : जलवाहिन्यांचे जाळे विस्तारण्यासाठी मुंबई महापालिकेने ठाणे-भिवंडीदरम्यान तरई गावाजवळील जमिनी संपादित केल्या आहेत. या ठिकाणच्या गावकऱ्यांना ये-जा करण्यासाठी १९५४ साली पूल बांधला होता. मात्र धोकादायक झाल्याने तो पाडून नव्याने पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. तसेच पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी कल्व्हर्टस बांधण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला असून यासाठी ३५ कोटी ८८ लाख ९ हजार रुपये खर्च करण्यात येणार आहे.

मुंबईपासून १२० किलोमीटर अंतरावरून मुंबईला सात धरणांतून पाणीपुरवठा केला जातो. मुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठी जलवाहिन्यांचे जाळे विस्तारणे गरजे होते. यासाठी ठाणे-भिवंडीदरम्यान असलेल्या तरई गावाजवळील जमिनी संपादित केल्या आहेत. तरई गावाशेजारी अनेक गावे असून गावकऱ्यांना ये-जा करण्यासाठी १९५४ साली पूल बांधला होता. तसेच पाईपलाईन दुरुस्तीवेळी आणि पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी कल्व्हर्टस बांधण्यात आली होती. अनेक वेळा पुलाची व कल्व्हर्टसची दुरुस्ती करण्यात आली. मात्र व्हीजेटीआयने केलेल्या अभ्यासात पूल व कल्व्हर्टस धोकादायक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच पूल व कल्व्हर्टसची तातडीने दुरुस्ती अथवा नव्याने बांधण्याची शिफारस केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in