विनायक मेटे यांच्या पुतण्याची आत्महत्या

दोन महिन्यांपूर्वीच विनायक मेटे यांच्या निधनाला वर्ष पूर्ण झाले
विनायक मेटे यांच्या पुतण्याची आत्महत्या

बीड : दिवंगत आमदार विनायक मेटे यांचा पुतण्या सचिन मेटे याने राहत्या गावी गळफास घेत आत्महत्या केली. ३४ वर्षीय सचिन मेटे याने आत्महत्या का केली, याचा पोलीस तपास करत आहेत. दोन महिन्यांपूर्वीच विनायक मेटे यांच्या निधनाला वर्ष पूर्ण झाले आहे. सध्या मराठा आरक्षणाचे आंदोलन सुरू असताना मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील आघाडीचे नेते विनायक मेटे यांच्या पुतण्याने केलेल्या आत्महत्येमुळे मेटे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मागील वर्षी रस्ते अपघातात विनायक मेटेंचा अपघाती मृत्यू झाला होता. विनायक मेटेंच्या मृत्यूच्या धक्क्यातून मेटे कुटुंबीय सावरत असतानाच सचिनच्या आत्महत्येमुळे कुटुंबाला जबर धक्का बसला आहे.

logo
marathi.freepressjournal.in