मुलुंड घरबांधणी प्रकल्पात नियमावलीचे उल्लंघन; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची विकासकाला नोटीस

मुलुंड घरबांधणी प्रकल्पात नियमावलीचे उल्लंघन; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची विकासकाला नोटीस

पर्यावरण व प्रदूषण नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने विकासकाला नोटीस बजावली आहे.

मुंबई : प्रकल्प बाधितांसाठी मुलुंड येथे सदनिका बांधण्यात येत आहे. मात्र पर्यावरण व प्रदूषण नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने विकासकाला नोटीस बजावली आहे. दरम्यान, नियमावलीचे पालन करण्यासाठी काय उपाययोजना केल्या, याचे उत्तर सात दिवसांत द्या, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीशीत नमूद केले आहे.

मुलुंड पूर्व येथील केळकर महाविद्यालय परिसरात पालिकेतर्फे प्रकल्पग्रस्त वसाहतीचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. तब्बल ७,४३९ घरे बांधली जाणार असून त्याचे काम संबंधित कंत्राटदारास देण्यात आले आहे. या प्रकल्पात विविध पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याची तक्रार ॲॅड. सागर देवरे यांनी केली होती. त्यावर एमपीसीबीने १ जानेवारी २०२४ रोजी विकासकाला लेखी नोटीस बजावली आहे. पर्यावरण कायदा आणि नियमांचे पालन करण्याच्या अटीवर या प्रकल्पास परवानगी देण्यात आली आहे. मात्र प्रकल्पात पुरेशा जल आणि वायू प्रदूषण नियंत्रण नियमावलींचे पालन झाले नसल्याचे आढळून आले आहे. नियमावलीची तपासणी करण्यासाठी एमपीसीबीच्या मुंबई मंडळाच्या अधिकाऱ्याने २५ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रकल्पस्थळी भेट दिली होती. यावेळी अनेक नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्याचे नोटीसीत नमूद केले आहे.

एमपीसीबीला या त्रुटी आढळल्यास?

बांधकाम ठिकाणी बॅरिकेड्स, पत्रे खराब अवस्थेत आढळले असून त्यामुळे वातावरणात धूळ पसरते.

धूळ उडू नये म्हणून पाणी शिंपडण्यासाठी दिलेल्या पाण्याच्या टँकरने अंतर्गत रस्त्यावर चिखल पसरला असून धूळ नियंत्रणासाठी स्मॉग गन अपुऱ्या आहेत.

बांधकाम ठिकाणी राडारोडा, माती पसरली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in