अपील करण्यासाठी तीन महिन्यांचा अवधी उपलब्ध- विशाखा राऊत; कायदेशीर सल्ला घेत पुढील निर्णय घेणार - अमय घोले

दादर येथील प्रभाग क्रमांक-१९१ च्या शिवसेना उद्धव ठाकरे सेनेच्या विद्यमान नगरसेविका विशाखा राऊत यांचे जात प्रमाणपत्र पालघर जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरवले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी सोमवारी पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची भेट घेत अपील करण्यासाठी तीन महिन्यांची वेळ असल्याचे निदर्शनास आणून दिले.
अपील करण्यासाठी तीन महिन्यांचा अवधी उपलब्ध- विशाखा राऊत; कायदेशीर सल्ला घेत पुढील निर्णय घेणार - अमय घोले
अपील करण्यासाठी तीन महिन्यांचा अवधी उपलब्ध- विशाखा राऊत; कायदेशीर सल्ला घेत पुढील निर्णय घेणार - अमय घोले
Published on

मुंबई : दादर येथील प्रभाग क्रमांक-१९१ च्या शिवसेना उद्धव ठाकरे सेनेच्या विद्यमान नगरसेविका विशाखा राऊत यांचे जात प्रमाणपत्र पालघर जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरवले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी सोमवारी पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची भेट घेत अपील करण्यासाठी तीन महिन्यांची वेळ असल्याचे निदर्शनास आणून दिले.

याच प्रभागातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवार प्रिया सरवणकर यांचा विशाखा राऊत यांनी पराभव केला होता. आता विशाखा राऊत यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याने त्या प्रभागात प्रिया सरवणकर यांच्या बाजूने जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने निकाल दिला असून कायदेशीर सल्ला घेत पुढील निर्णय घेण्यात येईल, असे पालिकेतील गटनेते अमय घोले यांनी सांगितले.

विशाखा राऊत यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्याने त्यांचे नगरसेवकपद धोक्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, शिवसेना (उबाठा)ने याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. शिष्टमंडळाने सोमवारी आयुक्त अश्विनी भिडे यांची भेट घेत राऊत यांना तत्काळ अपात्र ठरवू नये, अशी मागणी केली. जात पडताळणी समितीच्या निर्णयाविरोधात कोकण विभागीय आयुक्तांकडे अपील करण्यासाठी त्यांच्याकडे तीन महिन्यांची मुदत उपलब्ध आहे, असेही सांगितले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in