Mumbai : मतदारांच्या सुविधेसाठी विशेष शिबिरे; मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी २६ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेंतर्गत मतदारांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करावे.
Mumbai : मतदारांच्या सुविधेसाठी विशेष शिबिरे; मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी २६ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
Mumbai : मतदारांच्या सुविधेसाठी विशेष शिबिरे; मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी २६ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
Published on: 

मुंबई : मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेंतर्गत मतदारांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करावे. तसेच, प्रारूप मतदार यादीतील नाव किंवा अन्य नोंदींबाबत प्राप्त होणारे दावे आणि हरकती यांची प्रक्रिया ठरलेल्या पद्धतीने पूर्ण करावी, असे निर्देश महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिले. मतदार यादीतील दावे आणि हरकती दाखल करण्यासाठी २६ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

मुंबईतील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) २०२६ कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी (१३ ऑक्टोबर) मुंबई महानगरपालिका मुख्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा महापालिका आयुक्त अश्विनी भिडे आणि मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली. यावेळी अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी-अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता वर्मा-लवंगारे, डॉ. विपिन शर्मा, अभिजीत बांगर आदी उपस्थित होते.

सुलभतेने प्रक्रिया पूर्ण करता यावी!

या बैठकीत एसआयआर कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. प्रारूप मतदार यादीतील नाव, नोंदी किंवा अन्य तपशिलांबाबत नागरिकांना दावे आणि हरकती दाखल करता याव्यात, यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यावर भर देण्यात आला. मुदतवाढीच्या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्याची प्रक्रिया योग्य प्रकारे पार पाडण्याबरोबरच नागरिकांना ही प्रक्रिया सुलभतेने पूर्ण करता यावी, यासाठी शिबिरे आयोजित करण्याच्या सूचना चोक्कलिंगम यांनी दिल्या.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in