मतदारांची नोंद दुसऱ्याच प्रभागात, ४०२ हरकती सूचना मुंबई महापालिकेकडे प्राप्त

२३६ प्रभागांची संख्या वाढून २३६ झाली आहे. नवीन प्रभाग रचनेनुसार ३१ मे रोजी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली
मतदारांची नोंद दुसऱ्याच प्रभागात, ४०२ हरकती सूचना मुंबई महापालिकेकडे प्राप्त

नावात बदल, दुसऱ्याच प्रभागात नावाची नोंद अशा विभिन्न प्रकारच्या हरकती सूचना मुंबई महापालिकेकडे प्राप्त झाल्या आहेत. २३ जून ते ३ जुलैपर्यंत ४०२ हरकती सूचना प्राप्त झाल्या आहेत. विशेष म्हणजे प्राप्त हरकती सूचनांवर सुनावणी होणार नसल्याचे निवडणूक विभागातील अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, विधानसभा मतदार यादीत राहण्याचा नवीन पत्ता बदलला नसेल तर त्यात बदल होणार नाही, असा स्पष्ट इशारा राज्य निवडणूक आयोगाने दिला आहे. तसेच प्राप्त हरकती सूचनांवर सुनावणी होणार नसल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

२३६ प्रभागांची संख्या वाढून २३६ झाली आहे. नवीन प्रभाग रचनेनुसार ३१ मे रोजी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व ३१ मे २०२२ रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या ग्राह्य धरण्यात आल्या आहेत. २३ जून रोजी मतदार यादी पालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानंतर २३ ते ३ जुलैपर्यंत हरकती सूचना मागवण्यात आल्या होत्या. ३ जुलैपर्यंत ४०२ हुन अधिक हरकती व सूचना प्राप्त झाल्या आहेत.

मतदार प्रत्यक्षात राहतो एका प्रभागात आणि त्याचे नाव शेजारच्या प्रभागाच्या प्रारूप मतदार यादीत सामाविष्ट आहे. अशा प्रकारच्या चुका दुरूस्ती करण्यात येणार आहेत. मतदारांनी त्यांचा पुर्वीचा राहण्याचा पत्ता बदलला, परंतु मतदार नोंदणी अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, यांच्याकडे पत्रव्यवहार करून नवीन पत्ता राहत्या ठिकाणच्या विधानसभा मतदार यादीत बदलून घेतलेला नाही. मूळ नोंदणीत बदल करण्याचे अधिकार मुंबई महापालिकेला नसल्याने अशा प्रकारच्या हरकती सूचनांची दखल घेणे शक्य नाही, असे ही अधिकाऱ्याने सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in