
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात ज्येष्ठ व दिव्यांगांनी मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे यासाठी त्यांच्या घरी जाऊन मतदानाची प्रक्रिया पार पडली जात असून मुंबादेवी विधानसभा मतदारसंघात १०३ जेष्ठ नागरिक तर ११ दिव्यांगांनी मतदान करत हक्क बजावला.
मुंबई शहर जिल्ह्यात मतदान केंद्रावर उपस्थित राहणे शक्य नसलेल्या प्रपत्र १२ ड भरलेल्या ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांसाठी टपाली मतदान पथकामार्फत घरपोच मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अंतर्गत मुंबादेवी विधानसभा मतदारसंघात १०३ ज्येष्ठ नागरिक आणि ११ दिव्यांग मतदारांनी गृह टपाली मतदान केले. मुंबादेवी मतदारसंघात ८५ वर्षांवरील एकूण ११८ ज्येष्ठ नागरिक मतदार आहेत, त्यापैकी १०३ अर्जदारांनी, १३ पैकी ११ दिव्यांग मतदारांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे प्रपत्र १२ ड भरून जमा केले होते. या ११४ अर्जदारांचे गृह टपाली मतदान घेण्यात आले.