प. रेल्वेचे नवीन वेळापत्रक उद्यापासून; लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ

सात सेवा या अप मार्गावर चर्चगेटपर्यंत तर पाच सेवा या डाऊन मार्गावर डहाणूपर्यंत चालवल्या जातील
प. रेल्वेचे नवीन वेळापत्रक उद्यापासून; लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ

पश्चिम रेल्वेचे १ ऑक्टोबरपासून नवीन टाईम टेबल अंमलात येणार आहे. या टाईम टेबलमध्ये १२ साध्या व ३१ एसी लोकल सुरू करण्यात येणार आहे. तर ५० सेवांची विस्तार केला असून ४ फेऱ्या रद्द केल्या आहेत. यामुळे लोकलच्या फेऱ्यांची संख्या १३७५ वरून १३८३ पोहचली आहे. यात ११२ हार्बर सेवांचा समावेश आहे.

प. रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, नवीन वेळापत्रकात प्रवाशांच्या मागण्यांकडे लक्ष पुरवले आहे. १२ नवीन साध्या गाड्या सुरू करण्यात येणार आहेत. त्यातील सात सेवा या अप मार्गावर चर्चगेटपर्यंत तर पाच सेवा या डाऊन मार्गावर डहाणूपर्यंत चालवल्या जातील. तर चार सेवा रद्द केल्या आहेत. ५ नवीन फेऱ्यांमध्ये चर्चगेट ते विरार दरम्यान एक जलदगती तर दोन धीम्या मार्गावर चालवल्या जातील. दोन लोकल चर्चगेट ते बोरिवली, एक अंधेरी-वसई, एक वसई ते डहाणू मार्गावर चालवल्या जातील. तर ‘अप’ मार्गावर सात सेवा चालवल्या जातील. डहाणू ते चर्चगेट व विरार-चर्चगेट मार्गावर प्रत्येकी एक गाडी सोडण्यात येईल. विरार-बोरीवली मार्गावर १ धीमी, वसई रोड ते अंधेरी मार्गावर १ धीमी, गोरेगाव-चर्चगेट मार्गावर १ धीमी गाडी सोडण्यात येईल.

logo
marathi.freepressjournal.in