दादरमध्ये ‘वॉलेट’ पार्किंग' योजना राबवण्यात येणार

 दादरमध्ये ‘वॉलेट’ पार्किंग' योजना राबवण्यात येणार

मध्य व पश्चिम रेल्वे मार्गावरील सर्वांत महत्त्वाचे स्थानक म्हणजे दादर. दादर पश्चिम परिसर नेहमीच वर्दळीचा सणासुदीच्या काळात मुंगीलासुद्धा पाय ठेवायला जागा नसते, अशा ठिकाणी वाहन पार्किंग करणे चालकांसाठी डोकेदुखी असते. मात्र आता वाहन पार्किंगची कटकट दूर होणार आहे. दादरमध्ये ‘वॉलेट’ पार्किंग' योजना राबवण्यात येणार आहे. मुंबई महापालिका, वाहतूक पोलीस व दादरमधील व्यापारी संघाने हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, चार तासांसाठी १०० रुपये तर पुढील तपासाठी २५ रुपये आकारण्यात येणार आहे.

दादर पश्चिम म्हणजे रोज हजारो लोकांची ये जा सुरु असते. सकाळ व संध्याकाळी दादर पश्चिमेला चालण्यासाठी जागा उपलब्ध नसते, अशा ठिकाणी वाहन पार्किंग करणे गाडी मालक व चालकांसाठी मोठी डोकेदुखी ठरते. वाहन पार्किंग समस्या दूर करण्यासाठी 'व्हॅले पार्किंग' सुविधेचा पर्याय काढण्यात आला आहे. दादर व्यापारी संघातर्फे ऑगस्ट ते दिवाळीमध्ये ही पार्किंग योजना राबविण्यात आली होती. त्यास नागरिकांकडून भरगोघ प्रतिसाद मिळाला होता. ही बाब लक्षात घेऊन ही योजना मोठ्या प्रमाणात राबविण्यात येणार आहे. प्लाझा चित्रपटगृहाजवळ या योजनेचा शुभारंभ करण्यात आला.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in