वॉण्टेड आरोपीस तीन वर्षांनी अटक

वाहनाची धडक लागली म्हणून या दोघांमध्ये जून २०२० रोजी भांडण झाले होते
वॉण्टेड आरोपीस तीन वर्षांनी अटक

मुंबई : हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांतील एका वॉण्टेड आरोपीस तीन वर्षांनी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. ढब्बू ऊर्फ शिवानंद ओमप्रकाश मिश्रा असे या आरोपीचे नाव असून, अटकेनंतर त्याला दिडोंशी पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे. शिवानंद हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध सहाहून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले. मिंटू हरिलाल भारद्वाज हा गोरेगाव येथील गोकुळधाम परिसरात राहत असून, शिवानंदच्या परिचित आहे. वाहनाची धडक लागली म्हणून या दोघांमध्ये जून २०२० रोजी भांडण झाले होते. या भांडणानंतर शिवानंद व त्याचा मित्र दस्तगीर शेख याने मिंटूवर तिक्ष्ण हत्याराने वार केले होते. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. याप्रकरणी दिडोंशी पोलिसांनी दोन्ही आरोपीविरुद्ध मारहाण करणे, हत्येचा प्रयत्नासह शिवीगाळ करुन धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. याच गुन्ह्यांत नंतर दस्तीर शेखला पोलिसांनी अटक केली होती. मात्र शिवानंद हा पळून गेला होता. गेल्या तीन वर्षांपासून त्याचा पोलीस शोध घेत होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in