फसवणुकीच्या गुन्ह्यातील वॉण्टेड आरोपीस पाच वर्षांनी अटक

या तक्रारीनंतर पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता. आरोपीचा शोध सुरू असताना तो गोवंडी परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती.
फसवणुकीच्या गुन्ह्यातील वॉण्टेड आरोपीस पाच वर्षांनी अटक
Published on

मुंबई : फसवणुकीसह चोरीच्या गुन्ह्यांतील एका वॉण्टेड आरोपीस अंधेरी पोलिसांनी अटक केली. मंसुर मुन्ना शाबीर खान असे या आरोपीचे नाव असून, अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. मंसुरविरुद्ध अनेक गुन्ह्यांची नोंद असून, त्याच्या अटकेने १५हून अधिक गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. अंधेरी येथे सविता दुंगराम सोलंकी ही महिला तिच्या पतीसोबत राहते. १२ जानेवारीला एका अज्ञात व्यक्तीने टिव्हीवर फ्री वायफाय कनेक्शन लावून देतो, असे सांगून तिच्याकडील सोन्याचे बांगड्या घेऊन पलायन केले होते. या प्रकारानंतर या महिलेने अंधेरी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता. आरोपीचा शोध सुरू असताना तो गोवंडी परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. या माहितीनंतर सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत भोसले यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक अमित साटम, सुपे, पोलीस शिपाई सुरनर, कांबळे,जाधव, बाबर, टरके, नरबट, पाटील यांनी गोवंडीतील शिवाजीनगर परिसरातील राहत्या घरातून मंसुरला शिताफीने अटक केली.

logo
marathi.freepressjournal.in