साडेसहा लाखांच्या चोरीप्रकरणी वॉण्टेड नोकराला अटक

लोकल कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे
साडेसहा लाखांच्या चोरीप्रकरणी वॉण्टेड नोकराला अटक

मुंबई : सुमारे साडेसहा लाखांच्या चोरीनंतर पळून गेलेल्या एका वॉण्टेड नोकराला साकिनाका पोलिसांनी अटक केली. रिझवान अरमान हाश्मी ऊर्फ रिझवान इद्रीसी असे या नोकराचे नाव असून, चोरीचा गुन्हा दाखल होताच तो गेल्या दहा महिन्यांपासून फरार होता. पोलीस कोठडीनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मोहम्मद गुलाब खान हे कापड व्यावसायिक असून साकिनाका येथे कपड्याचा एक कारखाना आहे. तिथेच आठ कामगार कामाला आहेत. त्यात रिझवान हाश्मीचा समावेश होता.

नोव्हेंबर २०२२ साली त्यांना वडाळा येथील सहारा इंटरप्रायझेज कंपनीकडून ९०० तर वसईतील फ्रिकी फॅशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून ८५० शर्टाची ऑर्डर मिळाली होती. ७ नोव्हेंबर २०२२ रोजी या शर्टची डिलीव्हरी दोन्ही कंपन्यांना करायची होती. मात्र मोहम्मद गुलाब शेख हे त्यांच्या बीड येथील गावी असल्याने त्यांनी डिलीव्हरी नंतर करतो असे सांगितले होते. गावाहून परत आल्यानंतर त्यांना रिझवान हा कारखान्यात आल्याचे समजले होते.

डिलीव्हरीसाठी घेतलेले ६ लाख ६३ हजार रुपयांचे १०५० शर्ट तो घेऊन गेला होता. तो शर्ट घेऊन पळून गेल्याची खात्री होताच त्यांनी साकिनाका पोलिसांत तक्रार केली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in