Mumbai : ठाकरेंची नगरसेविका नॉट रिचेबल; प्रभाग क्र. १५७ च्या नगरसेविका सरिता म्हस्के शिंदेंच्या संपर्कात असल्याची चर्चा

मुंबईतील साकीनाका येथील प्रभाग क्रमांक १५७ च्या नवनिर्वाचित नगरसेविका सरिता म्हस्के ‘नॉट रिचेबल’ असल्याने चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, सरिता म्हस्के एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे बोलले जाते.
ठाकरेंची नगरसेविका नॉट रिचेबल; प्रभाग क्र. १५७ च्या नगरसेविका सरिता म्हस्के शिंदेंच्या संपर्कात असल्याची चर्चा
ठाकरेंची नगरसेविका नॉट रिचेबल; प्रभाग क्र. १५७ च्या नगरसेविका सरिता म्हस्के शिंदेंच्या संपर्कात असल्याची चर्चाPhoto : Facebook
Published on

मुंबई : कल्याण-डोंबिवलीत मनसेने शिवसेना शिंदे गटाला खुले समर्थन जाहीर केले आहे, तर ठाकरे गटाचे ४ नगरसेवक फुटल्याने तेथील राजकारण चांगलेच तापले आहे. त्यातच आता मुंबईतील साकीनाका येथील प्रभाग क्रमांक १५७ च्या नवनिर्वाचित नगरसेविका सरिता म्हस्के ‘नॉट रिचेबल’ असल्याने चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, सरिता म्हस्के एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे बोलले जाते.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील ४ नगरसेवक फुटल्यानंतर ठाकरे यांच्या शिवसेनेला मुंबईतही मोठा धक्का बसला आहे. वॉर्ड क्रमांक १५७ मधील उबाठाच्या नगरसेविका सरिता म्हस्के दोन दिवसांपासून ‘नॉट रिचेबल’ आहेत. कोकण विभागीय आयुक्तांकडे गटनोंदणी करण्याआधी ठाकरेंच्या शिवसेनेकडून मंगळवारी सर्व नगरसेवकांना संपर्क करण्यात आला. मूळ कागदपत्रांसह बुधवारी शिवसेना भवनात बैठकीसाठी दाखल व्हावे, असा ‘मातोश्री’चा आदेशही कळविण्यात आला. परंतु, मंगळवारी, बुधवारी दिवसभर म्हस्के दाम्पत्याशी संपर्क झाला नाही. त्यांच्या निकटवर्तीयांना देखील संपर्क करण्यात आला. मात्र, सरिता म्हस्के कुठे आहेत, याबाबत कोणालाही माहिती नव्हती. बुधवारी दुपारपर्यंत त्यांचाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला.

नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के यांच्या फुटीसंदर्भातही ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी भूमिका मांडली. “नगरसेविका सरिता म्हस्के आमच्या संपर्कात आहेत, त्या कुठेही गेलेल्या नाहीत. त्यांनी त्यांचे कौटुंबिक कारण सांगितले आहे. पुढील एका महिन्यापर्यंत कोकण विभागीय आयुक्तांकडे नोंदणी करण्यासाठी कायदेशीर वेळ आहे. त्यामुळे सरिता म्हस्के यांची नोंदणी होईल. म्हस्के यांनी दिलेले कारण आम्ही कोकण विभागीय आयुक्तांना सांगितले आहे. मात्र, महिनाभरानंतरही त्या न आल्यास काय कारवाई करायची, याबाबत पक्षश्रेष्ठीच निर्णय घेतील. मात्र तशी वेळ येणार नाही,” असे अनिल परब यांनी सांगितले.

त्यांच्यावर काय कारवाई ते पक्ष ठरवेल - पेडणेकर

कोकणभवनला ६५ नगरसेवकांपैकी एक नगरसेविका गैरहजर राहिल्याचे दिसते आहे. मात्र हा घोडेबाजार आहे. याबाबत चांगला नियम आणला पाहिजे. गैरहजर राहिलेल्या नगरसेविकेवर काय कारवाई होणार याबाबत पक्ष निर्णय घेईल, असे ठाकरे गटाच्या गटनेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in