मध्य वैतरणा धरण क्षेत्रातील गावांना सतर्कतेचा इशारा

मध्य वैतरणा धरण क्षेत्रातही पावसाचे प्रमाण अधिक आहे. मध्य वैतरणा धरणाची पाणी पातळी शनिवारी दुपारपर्यंत २८२.४० मी एवढी झाली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने २८३.५० मी पाणी पातळीला धरणाचे दरवाजे उघडण्यात येतील असे महसूल प्रशासनाने कळविले असून याबाबत धरणाखालील व धरण क्षेत्रातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मध्य वैतरणा धरण क्षेत्रातील गावांना सतर्कतेचा इशारा
संग्रहित फोटो
Published on

मोखाडा : सलग दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने मोखाडा तालुक्यात उच्छाद मांडला आहे. मध्य वैतरणा धरण क्षेत्रातही पावसाचे प्रमाण अधिक आहे. मध्य वैतरणा धरणाची पाणी पातळी शनिवारी दुपारपर्यंत २८२.४० मी एवढी झाली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने २८३.५० मी पाणी पातळीला धरणाचे दरवाजे उघडण्यात येतील असे महसूल प्रशासनाने कळविले असून याबाबत धरणाखालील व धरण क्षेत्रातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मध्य वैतरणा धरणाच्या विसर्गाचे पाणी मोडकसागर धरणात येते. त्यामुळे मोडकसागर धरणातून सुरू असलेला विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मोडकसागर धरणाचा सध्याचा विसर्ग ९५५५ क्युसेक्स इतका असून मध्य वैतरणा धरणातून सोडलेले पाणी वैतरणा नदीमार्गे मोडकसागर धरणात येते. त्यामुळे मध्य वैतरणा धरणातून पाणी सोडल्यास निसर्गामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्यामुळे धरण परिसरातील नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन महसूल प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. मध्य वैतरणा धरण ओसंडून वाहण्याची पातळी २८५-५०० मी टीएचडी इतकी आहे. त्यातच धरणाची पाणी पातळी २८२.४० इतकी वाढलेली असून २८३.५० इतक्या पाणी पातळीवर धरणातील पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे.

धरण क्षेत्रात शुक्रवारपासून पावसाचा जोर वाढलेला असल्यामुळे धरण क्षेत्रातील कोचाळे, करोळ, पाचघर, कारेगाव, कडूचीवाडी आणि सावर्डे या गावांसह धरणाखालील गावांना खबरदारीचा इशारा देण्यात आलेला आहे.

logo
marathi.freepressjournal.in