मुंबईत २४ एप्रिलपर्यंत पाणीकपात; भांडुप जल शुद्धीकरण केंद्राच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामामुळे निर्णय

भांडुप जलशुद्धीकरण केंद्र हे आशिया खंडातील सर्वात मोठे केंद्र आहे.
मुंबईत २४ एप्रिलपर्यंत पाणीकपात; भांडुप जल शुद्धीकरण केंद्राच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामामुळे निर्णय
Published on

मुंबई : भांडुप जल शुद्धीकरण केंद्राच्या देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्यामुळे २४ एप्रिलपर्यंत मुंबईत ५ टक्के पाणीकपात लागू केल्याचे पालिकेच्या जल विभागाकडून सांगण्यात आले.

भांडुप जलशुद्धीकरण केंद्र हे आशिया खंडातील सर्वात मोठे केंद्र आहे. भांडुप संकुलातील जलशुद्धीकरण केंद्रातून पालिकेच्‍या प्रमुख भागांना पाणीपुरवठा केला जातो. भांडुप संकुल येथे १ हजार ९१० दशलक्ष लिटर आणि ९०० दशलक्ष लिटर पाणी शुद्धीकरण करणारी दोन युनिट्स आहेत. त्‍यापैकी ९०० दशलक्ष लिटर क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राद्वारे प्रतिदिन ९९० दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया केली जाते.

logo
marathi.freepressjournal.in