पाणी गळती, टंचाई रोखणार ;जलवाहिन्यांचे जाळे विस्तारणार

पाणी गळतीचा प्रश्न मार्गी लागेल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले
पाणी गळती, टंचाई रोखणार ;जलवाहिन्यांचे जाळे विस्तारणार
Published on

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रातील पाणीसाठा वर्षभर मुंबईकरांची तहान भागवेल इतका आहे; मात्र पाणी गळती व पाणी चोरीमुळे पाणी टंचाईचा सामना मुंबईकरांना करावा लागतो. पाणी गळती रोखण्यासाठी मुंबई शहर व दोन्ही उपनगरातील जल वाहिन्या बदलत नवीन जाळे विस्तारले जाणार आहे. त्यामुळे पाणी गळतीचा प्रश्न मार्गी लागेल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तुळशी व विहार या सात धरणांतून मुंबईला दररोज ३,९०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो; मात्र यापैकी पाणी चोरी व गळतीमुळे ९०० दशलक्ष लिटर पाणी वाया जाते आणि मुंबईकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. वडाळा, कुर्ला, मालाड, कुरार गाव, कांदिवली चारकोप, गोराई, बोरीवली भागात पुरेसे पाणी मिळत नसल्याचे तेथील माजी नगरसेवकांनी पालिकेच्या निदर्शनास आणून दिले आहे. काही दिवसांपूर्वीच अंधेरी, विलेपार्ले परिसरातील नागरिकांनी पालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन देखील केले होते. त्यानंतर पालिकेने अनेक भागात जल वाहिन्यांमधील तांत्रिक दोष दूर करण्याचे, जलाशयांच्या ठिकाणी उपाययोजना करण्याचे काम सुरू केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in