धुळ नियंत्रणासाठी ड्रोनद्वारे पाणी फवारणी; कोस्टल रोड प्रकल्पाला पालिकेची नोटीस

मुंबईतील वाहतूककोंडी फोडण्यासाठी कोस्टल रोड प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार
धुळ नियंत्रणासाठी ड्रोनद्वारे पाणी फवारणी; कोस्टल रोड प्रकल्पाला पालिकेची नोटीस

मुंबई : प्रदूषणास कारणीभूत ठरणारे धुळीचे कण हवेत पसरू नयेत, यासाठी कोस्टल रोड प्रकल्पात ड्रोनद्वारे पाणी फवारणी करण्यात येत आहे. दरम्यान, कोस्टल रोड प्रकल्पात नियमांचे पालन करण्यात यावे, प्रदूषण नियंत्रणासाठी खबरदारी घ्यावी, अशी नोटीस पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

मुंबईतील वाहतूककोंडी फोडण्यासाठी कोस्टल रोड प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कोस्टल रोड प्रकल्पाचे आतापर्यंत ८० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. मात्र गेल्या दिवसांपासून मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली असून प्रदूषणात वाढ होत आहे. बांधकाम ठिकाणाहून धुळीचे कण प्रदूषणास कारणीभूत ठरत असून बांधकाम ठिकाणी नियमावलीचे जारी केली आहे. मुंबईत विविध प्राधिकरणाची सहा हजार कामे सुरू असून नियमावलीत पालन करावे, यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. मुंबईत कोस्टल रोड प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून प्रदूषणास कारणीभूत धुळीचे कण हवेत पसरू नयेत, यासाठी कोस्टल रोड प्रकल्पात अनेक ठिकाणी ड्रोनद्वारे पाणी फवारणी करण्यात येत असल्याचे कोस्टल रोड प्रकल्पातील अधिकाऱ्याने सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in