राज्यभरात मुसळधार पावसाला सुरुवात ; मुंबईतील अनेक ठिकाणी पाणी साचायला सुरुवात

ठाण्याकडून सीएसटीकडे जाणाऱ्या लोकल देखील 10 ते 15 मिनिटं उशिराने धावत आहेत
राज्यभरात मुसळधार पावसाला सुरुवात ; मुंबईतील अनेक ठिकाणी पाणी साचायला सुरुवात

मुंबईत काल पासून मुसळदार पाऊस पडत आहे. पश्चिम उपनगरात गेल्या अर्धा तासापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबईसाठी आज हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला असून 100 मिमीहून जास्त पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. फक्त मुंबईतच नाही तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात देखील काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला जातं आहे. मध्य महाराष्ट्रात आणि कोकणातील काही ठिकाणी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

मुंबई पश्चिम उपनगरात अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले,वांद्रे आणि सांताक्रुज परिसरात सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. जर असाच पाऊस सुरु राहिला तर अर्ध्या ते एक तासात सखल भागात पाणी साचायला सुरुवात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, ठाण्याकडून सीएसटीकडे जाणाऱ्या लोकल देखील 10 ते 15 मिनिटं उशिराने धावत आहेत.

पुढील तीन दिवस राज्यात जोरदार पावासाची शक्यता वर्तवली जातं आहे. मागील 24 तासात मुंबईतील धरण क्षेत्रात देखील चांगला पाऊस पडला आहे. मुंबईचा अंधेरी सबवे हा सखल भाग असल्यामुळं सबवे खाली पाणी भरलं आहे. याठिकाणी तीन ते चार फूट पाणी भरल असल्याने सध्या वाहतुकीसाठी हा मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. मुंबई अंधेरी सबवे बंद झाल्यामुळे अंधेरी पूर्व आणि पश्चिम परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

logo
marathi.freepressjournal.in