
मुंबई : लोअर परळ परिसरात असलेल्या १,४५० मिलीमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीचे काम येत्या गुरुवारी रात्री १० वाजल्यापासून ते शुक्रवार रात्री ८ वाजेदरम्यान हाती घेण्यात येणार आहे. या २२ तासांच्या कालावधीत ‘जी’ दक्षिण आणि ‘जी-उत्तर’ विभागातील लोअर परळ, करी रोड, प्रभादेवी, सेनापती बापट मार्ग आदी परिसरात पाणीपुरवठा पूर्णत:, तर काही ठिकाणी अंशत: बंद राहणार आहे. रहिवाशांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन मुंबई महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
लोअर परळ येथील सेनापती बापट मार्गावरील गावडे चौकात अस्तित्वात असलेल्या १,४५० मिलीमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनी दुरुस्तीचे काम जल अभियंता ‘जी-दक्षिण’ विभाग -
करी रोड, सखाराम बाळा पवार मार्ग, महादेव पालव मार्ग, ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ, लोअर परळ परिसर, ना. म. जोशी मार्ग, ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ, संपूर्ण प्रभादेवी परिसर, पी. बाळू मार्ग, हातिसकर मार्ग, आदर्श नगर, जनता वसाहत, अप्पासाहेब मराठे मार्ग, वीर सावरकर मार्ग, ना. म. जोशी मार्ग, सेनापती बापट मार्ग, पांडुरंग बुधकर मार्ग, गणपतराव कदम मार्ग, प्रभादेवी आणि संपूर्ण लोअर परळ स्थानक परिसर, सेनापती बापट मार्ग, वीर सावरकर मार्ग, गोखले मार्ग, काकासाहेब गाडगीळ मार्ग, सयानी मार्ग, भवानी शंकर मार्ग, सेनापती बापट मार्ग, एल. जे. मार्ग, वीर सावरकर मार्ग, गोखले मार्ग, अरुणकुमार वैद्य मार्ग आदी.