बोरिवली-दहिसरमध्ये भागांतील पाणीपुरवठा आज पूर्णपणे बंद


बोरिवली-दहिसरमध्ये भागांतील पाणीपुरवठा आज पूर्णपणे बंद

बोरिवली (पूर्व) परिसरातील ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासमोर (नॅशलन पार्क) पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या पूर्वेकडील ‘सर्व्हिस रोड’वर १०५० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी (जुने दहिसर आऊटलेट) बंद करण्याचे काम मंगळवार, १० मे रोजी सकाळी ११:३० ते रात्री १२ वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत मंगळवारी सकाळी ११:३० ते रात्री १२ वाजेपर्यंत ‘आर मध्य’ व ‘आर उत्तर’ विभागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा वेळेत कपात करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ‘आर उत्तर’ विभागातील काही परिसरांचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद करण्यात येईल.

बोरिवलीत संत ज्ञानेश्वर मार्ग (शांतिवन), श्रीकृष्ण नगर, अभिनव नगर, सावरपाडा, काजुपाडा (सखल पातळी परिसर), ईश्वर नगर, सुदाम नगर, चोगले नगर या परिसरात, तर दहिसरमधील ओवरीपाडा, राजेश कुंपण, शांती नगर, अशोकवन, शिव वल्लभ मार्ग, संत ज्ञानेश्वर मार्ग, न्यांसी डेपो, चोगले नगर, सावरपाडा, संभाजी नगर, शिव टेकडी, संतोष नगर, गणेश नगर, शुक्ला कुंपण, पांडे नगर या भागांत सकाळी ८.३० ते १० वाजेपर्यंतच पाणीपुरवठा करण्यात येईल.

शिव वल्लभ मार्ग (उत्तर बाजू), मारुती नगर, रावळपाडा, एस. एन. दुबे मार्ग, संत कबीर मार्ग, कोकणीपाडा, धारखाडी, सुहासिनी पावसकर मार्ग, वैशाली नगर, केतकीपाडा, एकता नगर, दहिसर टेलिफोन एक्स्चेंज, घरटनपाडा क्रमांक १ व २, संत मिराबाई मार्ग, वाघदेवी नगर, शिवाजी चौक, केशव नगर या भागांतील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in