मुंबईत बुधवारी पाणी ब्लॉक: जे.जे. रुग्णालय परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा; डॉकयार्ड रोड येथील जुनी जलवाहिनी बदलणार

२४ तासांच्या कालावधीत कुलाबा, नरिमन पॉइंट, सेंड हास्टॅ रोड व भायखळा परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे
मुंबईत बुधवारी पाणी ब्लॉक: जे.जे. रुग्णालय परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा; डॉकयार्ड रोड येथील जुनी जलवाहिनी बदलणार
Published on

मुंबई : नवानगर, डॉकयार्ड रोड येथील जुनी १२०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनी बंद करुन या ठिकाणी नवीन १२०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. यासाठी भंडारवाडा जलाशयाला जाणाऱ्या जुन्या १२०० मि.मी. च्या जलवाहिनीवर जलद्वार बसवण्याचे काम बुधवार, १७ जानेवारीला सकाळी १० ते गुरुवार, १८ जानेवारीला सकाळी १० वाजेपर्यंत एकूण २४ तासांसाठी हाती घेण्यात येणार आहे.

दरम्यान, २४ तासांच्या कालावधीत कुलाबा, नरिमन पॉइंट, सेंड हास्टॅ रोड व भायखळा परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर जे.जे. परिसरातील काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. जल विभागाच्या माध्यमातून जलवाहिनी बदवण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित परिसरातील नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा व पाणी जपून वापरावे, असे आवाहन जल विभागाने केले आहे.

या भागात पाणीपुरवठा बंद!

ए विभाग - कुलाबा

नेव्हल डॉकयार्ड सप्लाय - सेंट जॉर्ज हॉस्पिटल, पी. डिमेलो रोड, रामगड झोपडपट्टी, आर. बी आय., नेव्हल डॉकयार्ड, शहीद भगतसिंग मार्ग, जी. पी. ओ. जंक्शनपासून रिगल सिनेमापर्यंत पाणीपुरवठा पूर्णतः बंद

ई विभाग - सेंड हास्टॅ रोड

नेसबीट झोन (१२०० मि.मी. आणि ८०० मि.मी.) - ना. म. जोशी मार्ग, मदनपुरा, कामाठीपुरा, एम. एस. अली मार्ग, एम. ए. मार्ग, आग्रीपाडा, टँक पाखाडी मार्ग, क्लेअर रोड, सोफिया जुबेर मार्ग, भायखळा (पश्चिम) पाणीपुरवठा पूर्णतः बंद

माझगाव म्हातारपाखाडी रोड झोन

म्हातारपाखाडी मार्ग, सेंट मेरी रोड, नेसबीट रोड, ताडवाडी रेल्वे कुंपण, बॅ. नाथ पै मार्ग, डिलिमा स्ट्रीट, गनपावडर रोड, कासार गल्ली, लोहारखाता, कॉपरस्मिथ मार्ग, हातीबाग मार्ग - हातीबाग, शेठ मोतिशहा लेन, डि. एन. सिंघ मार्ग पाणीपुरवठा पूर्णतः बंद

मुंबई पोर्ट ट्रस्ट झोन

मुंबई पोर्ट ट्रस्ट, दारुखाना - पाणीपुरवठा पूर्णतः बंद

रे रोड झोन

बॅ. नाथ पै मार्ग, मोदी कुंपण, ऍटलास मिल कुंपण, घोडपदेव छेद गल्ली क्रमांक १-३ पाणीपुरवठा पूर्णतः बंद

माऊंट मार्ग रामभाऊ भोगले मार्ग, फेर बंदर नाका, वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान, घोडपदेव नाका, म्हाडा संकुल, भायखळा (पूर्व), शेठ मोतिशहा लेन, टी. बी. कदम मार्ग, संत सावता मार्ग पाणीपुरवठा पूर्णतः बंद

बी विभाग

बाबूला टँक झोन

मोहम्मद अली मार्ग, इब्राहिम रहिमत्तुला मार्ग, इमामवाडा मार्ग, इब्राहिम मर्चंट मार्ग, युसूफ मेहेर अली मार्ग पाणीपुरवठा पूर्णतः बंद

डोंगरी बी – झोन

नूरबाग, डोंगरी, रामचंद्र भट मार्ग, सॅम्युअल रस्ता, केशवजी नाईक मार्ग, नरसी नाथा रस्ता, पाणीपुरवठा पूर्णतः बंद

डोंगरी ‘ए’ झोन

उमरखाडी, वालपाखाडी, रामचंद्र भट मार्ग, समाताभाई नानजी मार्ग, शायदा मार्ग, नूरबाग आणि डॉ . महेश्वरी मार्ग - पाणीपुरवठा पूर्णतः बंद

मुंबई पोर्ट ट्रस्ट झोन

सर्व मुंबई पोर्ट ट्रस्ट झोन, पी. डिमेलो मार्ग - पाणीपुरवठा पूर्णतः बंद

मध्म रेल्वे – रेल्वे यार्ड पाणीपुरवठा पूर्णतः बंद

वाडी बंदर - पी. डिमेलो रोड, नंदलाल जैन मार्ग, लीलाधर शाह मार्ग, दानाबंदर, संत तुकाराम मार्ग - पाणीपुरवठा पूर्णतः बंद

वाडी बंदर - पी. डिमेलो मार्ग - पाणीपुरवठा पूर्णतः बंद

आझाद मैदान बुस्टींग - पाणीपुरवठा पूर्णतः बंद

या ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा

जे. जे. रुग्णालय – (२४ तास पाणीपुरवठा) कमी दाबाने पाणीपुरवठा

logo
marathi.freepressjournal.in