
आजपासून नवी मुंबई ते मुंबईला (Mumbai) जोडणारी वॉटर टॅक्सी (Water Taxi) सेवा सुरु झाली आहे. बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया वॉटर टॅक्सी सेवा सुरू झाली असून यामध्ये दोनशे प्रवाशी क्षमता आहे. वॉटर टॅक्सीमुळे एका तासात मुंबई ते नवी मुंबई असा प्रवास करता येणार आहे. सकाळी ८.३० वाजता बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया आणि संध्याकाळी ६.३० वाजता गेट वे ऑफ इंडिया ते नवी मुंबई अशा या दोन फेऱ्या काढणार आहेत.
बंदर प्राधिकरण आणि सागरी मंडळाने अत्याधुनिक अशा वॉटर टॅक्सीचा पर्याय समोर आणला होता. यापूर्वी भाऊचा धक्का ते बेलापूर, बेलापूर ते जेएनपीटी तसेच बेलापूर ते एलिफंटा अशी सेवा फेब्रुवारीमध्ये सुरू करण्यात आली होती. पण, या सेवेला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. परंतु, आता या वॉटर टॅक्सीमुळे नोकरदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. पण, या सेवेचा फायदा मुंबईकरांना कितपत होतो? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.