मुंबईकरांची पाणीचिंता वाढली; बाष्पी भवनामुळे पाण्याची पातळी घटली! ९०० दशलक्ष लिटर पाणी चोरी, गळतीमुळे वाया

दीड कोटी लोकसंख्या असलेल्या मुंबईची तहान भागवण्यासाठी रोज ३,९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो, असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. परंतु...
मुंबईकरांची पाणीचिंता वाढली; बाष्पी भवनामुळे पाण्याची पातळी घटली! ९०० दशलक्ष लिटर पाणी चोरी, गळतीमुळे वाया

गिरीश चित्रे / मुंबई

दीड कोटी लोकसंख्या असलेल्या मुंबईची तहान भागवण्यासाठी रोज ३,९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो, असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. परंतु पाणी चोरी व गळतीमुळे ९०० दशलक्ष लिटर पाणी वाया जाते. त्यामुळे मुंबईला दररोज प्रत्यक्षात ३ हजार दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस बरसेल की, नाही याची शाश्वती नाही. तलावक्षेत्रातील वाढते बाष्पीभवन, फक्त पाच महिने पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक असल्याने मुंबईकरांच्या पाणीचिंता वाढल्या आहेत.

गेल्या वर्षी धरणक्षेत्रात समाधानकारक पाऊस न पडल्याने १० टक्के पाणीकपात केली होती. यंदाही धरणक्षेत्रात ६ लाख ७५ हजार ४२७ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. हा पाणीसाठा पुढील पाच महिने मुंबईची तहान भागवेल इतका असल्याने मुंबईवर १० ते २० टक्के पाणी कपातीचे ढग दाटले आहेत. दरम्यान, पावसाचा अंदाज बांधणे जिकिरीचे झाले आहे. त्यात पिण्याच्या पाण्याचे नवीन स्त्रोत हाती नसल्याने जलविभागाने आतापासून पाणी चोरी व गळती रोखण्यावर पुरेपूर लक्ष केंद्रित केले आहे. निदान पुढील तीन महिने तरी पाणी गळतीचे प्रकार टाळण्यासाठी जलविभाग सज्ज असून पाणी माफियांवर वॉच ठेवला जाणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

वातावरणीय बदलांमुळे पाऊसही लहरी झाला आहे. त्यामुळे यंदा धरणक्षेत्रातील पाण्याच्या पातळीत घट होत असून गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा ८.५८ टक्क्यांनी पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे मुंबईत १० ते २० टक्के पाणी कपात संमिश्र पानावर

तीन वर्षांतील पाणीसाठा (टक्के)

२०२४ : ६,७५,४२७ ( ४६.६७)

२०२३ : ७,७५,६७७ ( ५२.०७)

२०२२ : ७,९९,६३७ ( ५५.२५)

२१ फेब्रुवारी रोजी धरणातील पाणीसाठा

धरण दशलक्ष लिटर

अप्पर वैतरणा १,७६,९८५

मोडक सागर ४८,७५८

तानसा ८०,८७९

मध्य वैतरणा २२,८७०

भातसा ३,२५,५९८

विहार १५,७२३

तुळशी ४,६१५

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in