नोकरीसाठी आमच्याकडे ड्रायव्हरची जागा रिकामी, निलेश राणेंची केसरकरांवर टीका

केंद्रीय मंत्री नारायण राणे तसेच त्यांच्या मुलांबाबत मी केलेले कोणतेही वक्तव्य आमच्या पूर्वीच्या वादाशी जोडले जाते.
नोकरीसाठी आमच्याकडे ड्रायव्हरची जागा रिकामी, निलेश राणेंची केसरकरांवर टीका

राणे कुटुंबीय आणि दीपक केसरकरांमधील वाद शमण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. केसरकर यांनी राणेंवर केलेल्या टीकेनंतर नितेश राणे आणि केसरकर यांनी नंतर जुळवून घेण्याची भूमिका घेतली होती; मात्र आता निलेश राणे यांनी या वादात आणखीनच तेल ओतल्याने हा वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. “नोकरी मागायची आहे तर नीट मागा, १ तारखेपासून आमच्याकडे ड्रायव्हरची जागा रिकामी आहे,” असे म्हणत निलेश यांनी केसरकर यांच्यावर हल्ला चढवला आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे तसेच त्यांच्या मुलांबाबत मी केलेले कोणतेही वक्तव्य आमच्या पूर्वीच्या वादाशी जोडले जाते. नकळत वक्तव्याला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे मी आता यापुढे पत्रकार परिषदेत कधीही राणेंचे नाव घेणार नाही. भाजप व शिंदे गटात वाद होईल, असे कोणतेही वक्तव्य करणे यापुढे टाळणार असल्याची भूमिका शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शनिवारी घेतली होती; मात्र निलेश राणेंनी थेट ड्रायव्हरची नोकरी देतो, असे म्हणत त्यांची खिल्ली उडवली आहे. केसरकरांकडून राणेंना आता कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

माजी खासदार निलेश राणे ट्विटद्वारे म्हणाले की, “दीपक केसरकर म्हणतो, मी राणेंबरोबर काम करायला तयार आहे. नोकरी मागायची आहे तर नीट मागा, १ तारखेपासून आमच्याकडे ड्रायव्हरची जागा रिकामी आहे.” त्यांचे लहान भाऊ आणि आमदार नितेश राणे यांनी केसरकरांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देणे टाळले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in