आम्ही काम पुढे नेतो - आदित्य ठाकरे

आम्ही काम पुढे नेतो - आदित्य ठाकरे

राजकीय हेतूने जे केलं जातं त्याची लोकांना माहिती आहे. आम्ही काम पुढे नेतो, असा टोला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विरोधकांना लगावला.

कोस्टल रोडचे ५३ टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले असून २०२३ अखेरपर्यंत कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत असेल, असा विश्वास पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. आदित्य ठाकरे यांनी बुधवारी कोस्टल रोडच्या कामाची बुधवारी पहाणी केली, त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कोस्टल रोड ड्रीम प्रोजेक्ट असून मुंबई महापालिकेचा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. आदित्य ठाकरे यांनी बुधवारी कोस्टल रोडच्या कामाची पहाणी केली. मुंबईतील विविध विकासकामांची माहिती माध्यमांना दिली. मुंबईची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रियदर्शनी पार्क ते वरळी सी-लिंक दरम्यान १०.५८ किमीचा कोस्टल रोड बांधण्यात येत आहे. पालिका या संपूर्ण प्रकल्पासाठी १२ हजार ७२१ कोटी रुपयांचा खर्च करणार आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in