

देवश्री भुजबळ/मुंबई: मुंबईत शनिवार-रविवारी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. ज्यामुळे दमट वातावरणापासून काहीसा दिलासा मिळाला. अनेक भागात ५० मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. मुंबई आणि शेजारच्या जिल्ह्यांसाठी रविवारी मध्यम ते मुसळधार पावसाचा 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला होता. तर पुढील चार दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू राहण्याची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने पुढील पाच दिवसांच्या वर्तवलेल्या अंदाजात म्हटले आहे.
रविवार सकाळपर्यंत, सांताक्रूझ वेधशाळेत या पावसाळ्यात आतापर्यंत १६०६.८ मिमी एकूण पावसाची नोंद झाली, जी वार्षिक सरासरी पावसाच्या ६९.२९% आहे. तर कुलाबा वेधशाळेत १४०३.३ मिमी पावसाची नोंद झाली, जी वार्षिक सरासरीच्या ६६.९८% आहे.
मुंबई शहर आणि उपनगरांसाठी येते ४८ तासांच्या स्थानिक हवामान अंदाजानुसार, आकाश सामान्यतः ढगाळ राहील आणि पावसाच्या मध्यम सरी कोसळण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३२ सेल्सीयस आणि २६ सेल्सीयस च्या आसपास असेल.