Mumbai Builder Suicide : 23व्या मजल्यावरून उडी मारत पारस मुंबईतील प्रसिद्ध बिल्डरची आत्महत्या

Mumbai Builder Suicide : 23व्या मजल्यावरून उडी मारत पारस मुंबईतील प्रसिद्ध बिल्डरची आत्महत्या

मुंबईतील एका प्रसिद्ध बिल्डरने आत्महत्या केली आहे (Mumbai Builder Suicide). 23व्या मजल्यावरून उडी मारत पारस पोरवाल नामक प्रतिष्ठित बिल्डरने आत्महत्या केली. या घटनेने बांधकाम क्षेत्रात खळबळ उडाली आहे. सध्या या आत्महत्येप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

पारस पोरवाल हे मुंबईच्या बांधकाम क्षेत्रातील प्रसिद्ध नाव होते. दक्षिण मुंबईत बांधकाम व्यावसायिक म्हणून त्यांनी आपला ठसा उमटवला. भायखळा येथील एका इमारतीच्या 23व्या मजल्यावरून खाली उडी मारून आत्महत्या केली.

पारस पोरवाल यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट नाही

या आत्महत्येप्रकरणी भायखळा पोलीस अधिक तपास करत आहेत. त्यांनी आत्महत्या का केली? आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली होती का? या अनुषंगाने पोलीस अधिक तपास करत आहेत. मृतदेहाचे पोस्टमॉर्टम झाल्यानंतर अधिक माहिती समोर येईल. सध्या या प्रकरणाचा पंचनामा करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. आत्महत्येचे गूढ उकलण्याचे आव्हान सध्या पोलिसांसमोर आहे. याप्रकरणी भायखळा पोलीस अधिक तपास करत आहेत.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in