Mumbai : विहिरींचे पुनरुज्जीवन रखडले; महापौर, आयुक्तांच्या आदेशांना केराची टोपली

‘एल-निनो’च्या प्रभावामुळे पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची शक्यता असताना मुंबईतील विहिरींचे पुनरुज्जीवन करण्याच्या महापौर रितू तावडे आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या आदेशाला पालिका प्रशासनाने केराची टोपली दाखवल्याचे उघड झाले आहे.
Mumbai : विहिरींचे पुनरुज्जीवन रखडले; महापौर, आयुक्तांच्या आदेशांना केराची टोपली
Mumbai : विहिरींचे पुनरुज्जीवन रखडले; महापौर, आयुक्तांच्या आदेशांना केराची टोपलीसंग्रहित छायाचित्र
Published on: 

मुंबई : ‘एल-निनो’च्या प्रभावामुळे पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची शक्यता असताना मुंबईतील विहिरींचे पुनरुज्जीवन करण्याच्या महापौर रितू तावडे आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या आदेशाला पालिका प्रशासनाने केराची टोपली दाखवल्याचे उघड झाले आहे.

महापौरांनी सहा महिन्यांपूर्वी, तर आयुक्तांनी चार महिन्यांपूर्वी विहिरींची पाहणी, स्वच्छता आणि पाणी पुनर्भरणाची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले होते.

मात्र, सर्वेक्षणानंतर प्रत्यक्ष कामे करण्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे विहिरींच्या पुनरुज्जीवनाची योजनेला मुहूर्त मिळेना असे चित्र निर्माण झाले आहे.

महापालिकेच्या जलअभियंता विभागाने पुन्हा एकदा हालचाली सुरू केल्या असून मुंबईतील २६ वॉर्डांमधील प्रत्येकी पाच ते सात विहिरींची सफाई करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. या कामांसाठी सुमारे ३० लाख रुपये खर्च अपेक्षित असून, प्रस्ताव मुंबई मनपाच्या अतिरिक्त आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.

३० लाखांचा खर्च; मंजुरीनंतरच कामांना सुरुवात

जलअभियंता विभागाने पुनरुज्जीवनासाठी योग्य असलेल्या विहिरींची माहिती घेऊन त्यांची साफसफाई करण्यासाठी निधीची तरतूद करण्याचे ठरविले आहे. २६ वॉर्डांतील प्रत्येकी पाच ते सात विहिरींची सफाई केली जाणार आहे. त्यासाठी एकूण सुमारे ३० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. मात्र आयुक्तांच्या मंजुरीनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

कामांचा पत्ता नाही!

उन्हाळ्यातील वाढती उष्णता, जलसाठ्यांवरील वाढता ताण आणि नागरिकांच्या पाणीटंचाईविषयक तक्रारींची दखल घेत महापौर रितू तावडे यांनी ४ एप्रिल रोजी जलविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. २००९ मध्ये अल्प पावसामुळे पाणीटंचाई निर्माण झाली असताना मुंबई महापालिकेने सार्वजनिक विहिरींची दुरुस्ती करून नागरिकांना पाणी उपलब्ध करून दिले होते. त्याचा फायदा मुंबईकरांना झाला होता. त्याच धर्तीवर मुंबईतील विहिरींची कार्यक्षमता तपासून तातडीने कार्यान्वित करता येणाऱ्या विहिरी सुरू करण्याचे निर्देश महापौरांनी दिले होते.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in