मुंबई : वाद सोडवण्यासाठी गेली, अन् हत्येच्या गुन्ह्यात अडकली! सामाजिक कार्यकर्त्या महिलेला तीन महिन्यांनी जामिन

जिल्हा न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर ज्योती शिंदे यांच्या वतीने अ‍ॅड. सुमीत काटे यांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती
मुंबई : वाद सोडवण्यासाठी गेली, अन् हत्येच्या गुन्ह्यात अडकली! सामाजिक कार्यकर्त्या महिलेला तीन महिन्यांनी जामिन

मुंबई : दोन गटांतील वादातून झालेल्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सामाजिक कार्यकर्त्या महिलेला तीन महिन्यांनंतर उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी आरोपी ज्योती शिंदे ही दोन गटातील वाद सोडवण्यासाठी गेली असल्याचा युक्तिवाद ग्राह्य धरत १५ हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्याचा जमीन मंजूर केला.

चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत २५ ऑगस्ट रोजी मध्यरात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमारास दोन गटांमध्ये झालेल्या वादातून नागेश उर्फ कृष्णा भंडारी या तरुणाची धारदार शस्त्राच्या सहाय्याने हत्या झाली. या प्रकरणी पोलिसांनी ज्योती शिंदेसह दोघा आरोपींविरोधात हत्येसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करून १५ सप्टेंबर रोजी चिंचवड पोलिसांनी अटक केली.

जिल्हा न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर ज्योती शिंदे यांच्या वतीने अ‍ॅड. सुमीत काटे यांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी अ‍ॅड. सुमीत काटे यांनी आरोपी ही सामाजिक कार्यकर्ती असल्याने दोन गटात झालेला वाद मिटविण्यासाठी घटनास्थळी गेली होती. पोलिसांनी त्यांच्यावरच संशय घेत नाहक हत्येचा गुन्हा दाखल केल्याचा दावा केला. ही वस्तुस्थिती व इतर बाबींची दखल घेत न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी ज्योतीला १५ हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. दरम्यान, ज्योतीला १५ सप्टेंबर रोजी चिंचवड पोलिसांनी अटक केली होती.

logo
marathi.freepressjournal.in