पश्चिम रेल्वेत फुकट्या प्रवाशांमध्ये वाढ; गतवर्षीच्या तुलनेत ३५ टक्क्यांनी संख्या वाढली

लोकल, मेल/ एक्स्प्रेसमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांवर पश्चिम रेल्वेने कठोर कारवाई केली आहे. एप्रिल ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत तिकीट तपासणी मोहिमेंतर्गत पश्चिम रेल्वेने ८४ कोटी २० लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे, तर वातानुकूलित उपनगरीय लोकलमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून १ कोटी २० लाखांचा दंड वसूल केला आहे.
पश्चिम रेल्वेत फुकट्या प्रवाशांमध्ये वाढ; गतवर्षीच्या तुलनेत ३५ टक्क्यांनी संख्या वाढली
Published on

मुंबई : लोकल, मेल/ एक्स्प्रेसमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांवर पश्चिम रेल्वेने कठोर कारवाई केली आहे. एप्रिल ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत तिकीट तपासणी मोहिमेंतर्गत पश्चिम रेल्वेने ८४ कोटी २० लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे, तर वातानुकूलित उपनगरीय लोकलमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून १ कोटी २० लाखांचा दंड वसूल केला आहे. गत वर्षीच्या एप्रिल ते ऑगस्ट महिन्यातील कारवाईच्या तुलनेत फुकट्या प्रवाशांची संख्या ३५ टक्क्यांनी वाढली आहे.

पश्चिम रेल्वे मुंबई उपनगरीय लोकल सेवा, मेल/एक्स्प्रेस तसेच प्रवासी गाड्या आणि सुट्टीच्या विशेष गाड्यांमध्ये सतत तिकीट तपासणी मोहिमा राबवत आहे. रेल्वेच्या वरिष्ठ व्यावसायिक अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली तिकीट तपासणी पथकाने एप्रिल ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत अनेक तिकीट तपासणी मोहिमा राबवल्या. यामध्ये विनातिकीट प्रवाशांकडून ८४ कोटी २० लाख रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली. ही कारवाई गेल्या वर्षीच्या तुलनेत ३५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. तसेच रेल्वे बोर्डाने निश्चित केलेल्या उद्दिष्टापेक्षा जवळजवळ १३ टक्के जास्त आहे.

या कारवाईत मुंबई उपनगरीय विभागात ८८ हजार केसेस शोधून ३.४४ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. वातानुकूलित लोकल गाड्यांमध्ये अनधिकृत प्रवाशांना रोखण्यासाठी, वारंवार अचानक तिकीट तपासणी मोहिमा देखील राबविण्यात येत आहेत.

एप्रिल ते ऑगस्ट २०२५ दरम्यान वातानुकूलित लोकलमधून विना तिकीट प्रवास करणाऱ्या ३६ हजारांहून अधिक अनधिकृत प्रवाशांना रेल्वकडून दंड करण्यात आला. त्यांच्याकडून दंड म्हणून १.२० कोटी रुपये वसूल करण्यात आले. वसूल केलेल्या दंडाची ही रक्कम गेल्या वर्षीच्या याच कालावधीपेक्षा जवळजवळ ५४ टक्के जास्त आहे.

मुंबई उपनगरीय विभागात लोकलमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून सुमारे २३ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

  • वातानुकूलित लोकल १.२० कोटीचा दंड

एप्रिल ते ऑगस्ट २०२५ दरम्यान वातानुकूलित लोकलमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून १.२० कोटी रुपये वसूल करण्यात आले.

  • एका महिन्यात १३.२१ कोटी दंड वसूल

ऑगस्ट २०२५ मध्ये पश्चिम रेल्वेने २.३९ लाख तिकीट नसलेल्या/अनियमित प्रवाशांना शोधून त्यांच्याकडून १३.२१ कोटी दंड वसूल केला.

logo
marathi.freepressjournal.in