पश्चिम रेल्वे मार्गावर लोकलच्या कॅमेऱ्याची नजर; 'हायटेक फ्रंट कॅमेरा' देखरेख-तपासात करणार मदत

दिवस-रात्र काम करण्याची क्षमता आणि २ मेगापिक्सेलचे रिझोल्यूशन असलेले हे कॅमेरे क्रू व्हॉईस आणि व्हिडीओ रेकॉर्डिंग सिस्टमनी सज्ज आहेत.
६१ ट्रेनमध्ये हायटेक फ्रंट कॅमेरा
६१ ट्रेनमध्ये हायटेक फ्रंट कॅमेरा
Published on

मुंबई: पश्चिम रेल्वेवर वातानुकूलित गाड्यांसह २२४ लोकल ट्रेनपैकी ६१ ट्रेनमध्ये हायटेक फ्रंट कॅमेरा लावण्यात आला आहे. दिवस-रात्र काम करण्याची क्षमता आणि २ मेगापिक्सेलचे रिझोल्यूशन असलेले हे कॅमेरे क्रू व्हॉईस आणि व्हिडीओ रेकॉर्डिंग सिस्टमनी सज्ज आहेत. त्यामुळे अपघातासारख्या घटनांसह देखरेख आणि तपासासाठी या कॅमेऱ्यांचा उपयोग होणार आहे.

पश्चिम रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, रेकॉर्डिंग आणि फुटेज स्टोअरींग करण्यासाठी हे कॅमेरे सक्षम आहेत. ट्रॅक, रेल्वे लाईन, तांत्रिक बिघाड आणि ओव्हरहेड उपकरणे रेकॉर्ड करण्यासाठी केबिनच्या समोर एक कॅमेरा लावला जातो. हे सीसीटीव्ही कॅमेरे तपासात मदत करतील असे या अधिकाऱ्याने सांगितले.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, लोकल ट्रेनच्या उरलेल्या कॅबमध्ये कॅमरा बसवण्याचे काम रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम्स (CRIS) द्वारे केले जाईल.

सीव्हीव्हीआरएस हे केवळ समोरच्या भागात पाळत ठेवण्यापुरते मर्यादित नाही. या प्रणालीमध्ये एकूण तीन सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. मोटरमन आणि गार्डसह धावणाऱ्या क्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी मोटर कॅबमध्ये दोन अतिरिक्त कॅमेरे बसवले आहेत.

जानेवारी २०२४ मध्ये वसईत झालेल्या एका भीषण अपघातानंतर पाच सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली. या अपघातात सिग्नलिंग विभागातील तीन रेल्वे कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर समितीच्या शिफारशीनुसार लोकलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in