काय झाडी, काय गर्दी, काय प्राणी, ओक्के मध्ये हाय एकदम,राणीबागेने केले ट्वीट

शिवसेनेचे सांगोल्याचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांनी आपल्या एका कार्यकर्त्याशी दिलखुलास संवाद साधला
काय झाडी, काय गर्दी, काय प्राणी, ओक्के मध्ये हाय एकदम,राणीबागेने केले ट्वीट

काय झाडी, काय गर्दी, काय प्राणी, ओक्के मध्ये हाय एकदम”, अशी राणीबागेची जाहिरात वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालय प्रशासनाने ट्वीट करून जाम धम्माल उडवून दिली. मात्र, राजकीय गदारोळात टीकेचा भडिमार होण्याच्या भीतीने ती जाहिरात लगेच प्रशासनाने हटविली आणि त्यावरून पेटणाऱ्या वादाला पूर्णविराम दिला.

शिवसेनेचे सांगोल्याचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांनी आपल्या एका कार्यकर्त्याशी दिलखुलास संवाद साधला. गुवाहाटीच्या घनगर्द जंगल आणि दऱ्याखोऱ्यातील एका पंचतारांकित हॉटेलात काही दिवस रमलेल्या शहाजीबापूंनी मनमूराद आनंद लुटला. दुष्काळी भागातील या आमदाराने आपल्या मनातील भावना त्यांनी… काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल… एकदम ओक्केमदी हाय, अशा शब्दात भावना व्यक्त केल्या. त्यांचा हा संवाद सर्वत्र व्हायरल झाला. हा संवाद लहानथोरांपासून सर्व लोकांना आवडला. त्यावर गाणी आणि कविताही तयार झाल्या.

शहाजीबापूच्या संवादाची भुरळ पालिकेच्या प्राणी संग्रहालय प्रशासनाला पडली. त्यांच्या संवादावरून राणीच्या बागेचे वर्णन त्यांच्या त्यात गावराण संवादात केले. ट्वीटरवरून हा संवाद व्हायरल झाला. राणीच्या बागेच्या प्रसिध्दीच्या उद्देशाने तो व्हायरल केला होता. मात्र राजकीय गदारोळात हा संवाद वादग्रस्त ठरू शकतो, हे लक्षात आल्यानंतर तो संवाद असलेली जाहिरात प्रशासनाने काढून टाकली. समाजमाध्यमांवर मात्र याविषयी फार चर्चा रंगत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in