प्रसाधनगृहात काय सुविधा हव्यात? पालिकेने मुंबईकरांकडून सूचना मागवल्या ;१४ हजार प्रसाधनगृह बांधण्यास मंजूरी

जिल्हा नियोजन विकास समितीच्या (डीपीडीसी) निधीतून पालिका करणार आहे
प्रसाधनगृहात काय सुविधा हव्यात? पालिकेने मुंबईकरांकडून सूचना मागवल्या ;१४ हजार प्रसाधनगृह बांधण्यास मंजूरी

मुंबई : मुंबईतील प्रसाधनगृहाची गैरसोय दूर करण्यासाठी मुंबई महापालिका लॉट १२ अंतर्गत १४ हजार शौचालये बांधणार असून, याला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. तसेच म्हाडाच्या प्रसाधनगृहाची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी मुंबई महापालिकेवर आहे. जिल्हा नियोजन विकास समितीच्या (डीपीडीसी) निधीतून पालिका करणार आहे; मात्र नव्याने बांधण्यात येणाऱ्या प्रसाधनगृहाच्या कामाचा दर्जा, प्रसाधनगृहात काय सुविधा असाव्यात, प्रसाधनगृहातील बॉक्सचे काम कशा प्रकारे करावे, याबाबत मुंबईकरांकडून मुंबई महापालिकेने अभिप्राय मागितले आहेत.

पालिकेच्या २४ वॉर्डात झोपडपट्टया, वस्ती, चाळींमध्ये पालिका, म्हाडामार्फत प्रसाधनगृह बांधण्यात आली आहेत. लॉट ११ मध्ये सुमारे २० हजारांहून अधिक प्रसाधनगृह बांधण्यात आल्यानंतर आता मुंबईतील लॉट १२ अंतर्गत १४ हजार १६६ सार्वजनिक तसेच सामूहिक प्रसाधनगृहाचे बांधकाम करण्यात येणार आहे, तर म्हाडाच्या प्रसाधनगृहांची जबाबदारी राज्य सरकारने पालिकेकडे सोपवली आहे. त्यामुळे लॉट १२ मध्ये प्राधिकरणाच्याही प्रसाधनगृहांचाही समावेश करण्यात आला आहे.

मुंबईत किती प्रसाधनगृहे

-महापालिका ३ हजार २०१

-म्हाडा ३ हजार ६००

-पैसे द्या, वापरा तत्त्वावर ८४०

-रहदारी, महामार्गावर १००

शौचालय उभारणीचा कालावधी

- २० शौचकुपांपेक्षा कमी क्षमतेच्या शौचालयांसाठी ६ महिने

- २० ते ४० शौचकुपांच्या क्षमतेच्या शौचालयांसाठी ९ महिने

- ४१ व त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या शौचालयांसाठी १२ महिने

कुठे, किती खर्च!

-शहर : ९३. ६८ कोटी रुपये

-पूर्व, पश्चिम उपनगर : ४४८.७३ कोटी रुपये

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in