अरे..हे काय चाललयं मुंबईत... चित्रा वाघ नेमक्या का भडकल्या ? वाचा...

नंगटपणा करणारी बाई म्हणत त्यांनी तिच्या अटकेची मागणी केली आहे. चित्रा वाघ यांनी ट्विट करत...
अरे..हे काय चाललयं मुंबईत... चित्रा वाघ नेमक्या का भडकल्या ? वाचा...

उर्फी जावेद तिच्या हटके फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते. फॅशन म्हणून तिने परिधान केलेल्या प्रत्येक पोशाखाची सोशल मीडिया तसेच मीडियाने दखल घेतली आहे. या विचित्र फॅशन सेन्समुळे तिला काही लोकांचा कडाडून विरोधही होत आहे. अनेकजण तिला विचित्र वाटणारे कपडे घालू नको असा सल्ला देखील देतात. अनेकदा तिच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी काही जण करत आले आहेत. दरम्यान, आता भाजप नेत्या चित्रा वाघही उर्फी जावेद वर भडकल्या आहेत. उर्फी जावेदला नंगटपणा करणारी बाई म्हणत त्यांनी तिच्या अटकेची मागणी केली आहे. चित्रा वाघ यांनी ट्विट करत उर्फी जावेदच्या अटकेची मागणी केली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी मुंबई पोलिसांनाही टॅग केले आहे. 

काय आहे या ट्विटमध्ये ?

“अरे..हे काय चाललंय मुंबईत? ही बाई सार्वजनिक ठिकाणी नंगटपणा करत आहे. तिला रोखण्यासाठी मुंबई पोलिसांकडे काही कलमे आहेत की नाही? उर्फी जावेदला तात्काळ बेड्या ठोकाव्यात. एकीकडे निष्पाप महिला/मुली विकृतांच्या शिकार होताहेत. तर ही बया अजून विकृती पसरवतआहे,” असे ट्वीट चित्रा वाघ यांनी केले आहे. आता या सर्व प्रकरणावर मुंबई पोलीस काय भूमिका घेत आहेत हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in