पोस्टल ते ईव्हीएम मतांचा फरक कसा? वरुण सरदेसाई यांचा निवडणूक आयोगाला सवाल 

विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेला बहुमत हे ईव्हीएम मशीनची कमाल आहे. २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणीला सुरुवात झाली त्यावेळी पोस्टलमध्ये मविआ १४३ जागांवर पुढे होती. मात्र ईव्हीएम मशीनची मतमोजणी झाली त्यावेळी मविआ ४६ जागांवर अडली. त्यामुळे पोस्टल ते ईव्हीएम मशीनमधील मतमोजणीचा इतका फरक कसा असा, सवाल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आमदार वरुण सरदेसाई यांनी उपस्थित केला आहे.
वरुण सरदेसाई
वरुण सरदेसाई संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेला बहुमत हे ईव्हीएम मशीनची कमाल आहे. २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणीला सुरुवात झाली त्यावेळी पोस्टलमध्ये मविआ १४३ जागांवर पुढे होती. मात्र ईव्हीएम मशीनची मतमोजणी झाली त्यावेळी मविआ ४६ जागांवर अडली. त्यामुळे पोस्टल ते ईव्हीएम मशीनमधील मतमोजणीचा इतका फरक कसा असा, सवाल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आमदार वरुण सरदेसाई यांनी उपस्थित केला आहे. सोमवारी दुपारी दादर येथील सेना भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

विधानसभा निवडणुका जाहीर होताच एक्झिट पोलमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी दोघांमध्ये अटीतटीची लढत होईल आणि जवळपास दोघांना सारखीच मतं मिळतील, असे सांगण्यात येत होते. मात्र विधानसभा निवडणुकीत २३ नोव्हेंबर रोजी आलेला निकाल अनपेक्षित होता. विधानसभा निवडणुकीचा निकाल हा जनतेला ही मान्य नाही. विरोधकांनी अनेकदा यावर आक्षेप घेतला आहे. मात्र राज्य निवडणूक आयोगाकडून समाधानकारक उत्तर मिळत नाही. वरळीत शिवसेनेचे उमेदवार आदित्य ठाकरे यांना पोस्टलमध्ये ५१ टक्के मते मिळाली, तर त्यांचे विरोधक मिलिंद देवरा यांना पोस्टलमध्ये फक्त ३० टक्के मते मिळाली. आदित्य ठाकरे हे मिलिंद देवरा यांच्यापेक्षा २१ टक्के मतांनी पुढे होते. मात्र ईव्हीएम मशीनची मतमोजणी सुरू झाली तसतसे आदित्य ठाकरे यांची मते ८ टक्क्यांनी कमी झाली, तर मिलिंद देवरा यांची ईव्हीएम मशीनच्या मतमोजणीत ८ टक्के मतांची वाढ झाली आहे.

वांद्रे पूर्व मतदारसंघातील उमेदवार वरुण सरदेसाई यांना पोस्टल मतांत ४७ टक्के वाढ होती. तर झिशान सिद्दीकी यांना २२ टक्के मत पोस्टल मध्ये होती. मात्र  ईव्हीएम मशीनची मतमोजणी सुरू झाली आणि झिशान सिद्दीकी यांच्या मतांमध्ये १२ टक्क्यांनी वाढ होते. परंतु मतदारांचा कौल मिळाल्याने ८ टक्के मतांनी विजयी झालो, असे वरुण सरदेसाई म्हणाले.

पोस्टलमध्ये मविआ १४३ जागांवर पुढे, ईव्हीएममध्ये ४६ जागांवर मविआ अडली 

logo
marathi.freepressjournal.in