महामार्गांवरील वाहतूककोंडीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दखल

रविवारी साताऱ्याहून मुंबईकडे परतत असताना दुपारी पुण्यातील चांदणी चौक परिसराला भेट दिली.
महामार्गांवरील वाहतूककोंडीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दखल
Published on

सण-उत्सव, सुट्ट्यांच्या काळात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी आणि पथकर नाक्यावर होणारी गर्दी टाळण्यासाठी आवश्यक ते मनुष्यबळ वाढवावे. सीसीटीव्ही यंत्रणा सक्षम करण्याबरोबरच अपघात टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

महामार्गांवर होणाऱ्या वाहतूककोंडीची मुख्यमंत्री शिंदे यांनी गांभीर्याने दखल घेतली. रविवारी साताऱ्याहून मुंबईकडे परतत असताना दुपारी पुण्यातील चांदणी चौक परिसराला भेट दिली. या भागात होणाऱ्या वाहतूक कोंडीसंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. प्रवासादरम्यान त्यांनी मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावरील खोपोली (खालापूर) टोलनाक्याला भेट दिली. या भागात होणाऱ्या वाहतूककोंडीचा मुख्यमंत्र्यानी आढावा घेतला.

logo
marathi.freepressjournal.in