राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये कोणाची वर्णी लागणार?

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी आपल्या लोकांची राजकीय सोय लावण्याचा प्रयत्न केला होता
राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये कोणाची वर्णी लागणार?

शिवसेना बंडखोर गट आणि भाजप युतीचे सरकार अस्तित्वात येऊन दोनच दिवस उलटले आहेत. मंत्रिमंडळात केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असे दोघेच आहेत. सरकारने अद्याप बहुमत चाचणी जिंकायची आहे. असे असताना चर्चा रंगली आहे, राज्यपाल नियुक्त १२ आमदारांमध्ये कोणाची वर्णी लागणार? उद्धव ठाकरे यांची विधान परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा दिल्यामुळे आता विधान परिषदेत १३ जागा रिक्त आहेत. त्यामुळे भाजपचा या जागा भरताना शिंदे गटासह मित्र पक्ष असलेल्या रयत क्रांती, शिवसंग्राम यांनाही यात स्थान देण्याचा प्रयत्न असणार आहे.

महाविकास आघाडीने सरकारने विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नेमणुकीसाठी शिफारस केलेल्या १२ जणांची यादी मागील दीड वर्षांपासून राजभवनात धूळ खात पडून आहे. यात आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी आपल्या लोकांची राजकीय सोय लावण्याचा प्रयत्न केला होता. तिन्ही पक्षांना प्रत्येकी चार जागा वाट्याला आल्या होत्या. काँग्रेसने आपले प्रवक्ते सचिन सावंत यांच्यासह रजनी पाटील, मुजफ्फर हुसैन आणि अनिरुद्ध वनकर यांची नावे दिली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांची राष्ट्रवादीच्या कोट्यातून शिफारस करण्यात आली होती. याशिवाय भाजपमधून राष्ट्रवादीत आलेले एकनाथ खडसे, प्रसिद्ध लोकगायक आनंद शिंदे आणि यशपाल भिंगे यांच्या नावाचा या यादीत समावेश होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in