आवाज कुणाचाऽऽ गोविंदाचा! गोविंदा रे गोपाळा गाण्यासह डीजेवर मुंबई थिरकली दहीहंडी उत्सव मंडळांत सेलिब्रिटी, नेत्यांची हजेरी

दहीहंडी उत्सवात राजकीय शक्तिप्रदर्शन लाखोंच्या बक्षिसांची लयलूट
आवाज कुणाचाऽऽ गोविंदाचा! गोविंदा रे गोपाळा गाण्यासह डीजेवर मुंबई थिरकली दहीहंडी उत्सव मंडळांत सेलिब्रिटी, नेत्यांची हजेरी

मुंबई : थरावर थर... बरसणारा पाऊस... चिंब भिजलेले गोविंदा... ढाक्कुमाक्कुमचा जल्लोष... डीजेंचा दणदणाट... सेलिब्रिटींच्या उपस्थितीत दहीहंडीचा उत्सव मुंबईसह ठाण्यात जोरदार उत्साहात साजरा झाला. पुढील वर्षी येणाऱ्या निवडणुका पाहता राजकीय नेतेमंडळींनी बिनधास्तपणे तिजोरी खोलून दहीहंडीवर बक्षिसांची लयलूट केली. दरम्यान, अनेक ठिकाणी मानवी मनोरे कोसळून झालेल्या घटनेत रात्री ९ वाजेपर्यंत ....... गोविंदा जखमी झाले.

दहीहंडी या पारंपरिक सणाला राजकीय नेत्यांनी प्रचाराचे साधन बनवल्यानंतर त्याच्यासाठी मोठमोठी बक्षिसे लावली आहेत. भाजप, शिवसेना, मनसे आदी पक्षांच्या नेत्यांनी मुंबई, ठाण्यात जोरदार दहीहंडीचा उत्सव आयोजित केला होता.

या उत्सवात विविध मंडळांत सेलिब्रिटी, नेतेमंडळींनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावल्याने गोविंदांचा उत्साह द्विगुणित झाला. त्यातच महिन्याभराच्या विश्रांतीनंतर पावसानेही सकाळपासून दमदार हजेरी लावल्याने गोविंदांचा उत्साह शिगेला पोहोचला होता, तर दुसरीकडे गो गो गोविंदा, मटकीफोड ब्रीजबाला, गोविंदा रे गोपाळा ही गाणी, तर ढाक्कुमाक्कुम ढाक्कुमाक्कुमसह अन्य गाण्यांवर मुंबई थिरकली. अनेक ठिकाणी चित्तथरारक पाच, सहा, सात, आठ व नऊ थरांपर्यंत मानवी मनोरे रचले. उंच उंच थर लावून मडकी फोडणाऱ्या गोविंदांसाठी असलेल्या लाखोंच्या बक्षिसांची लयलूट झाली.

मुंबईत सणांचा उत्साह मोठा असतो. मडकी फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये उंच उंच थर रचण्याची शर्यतच लागली होती. मुंबईत जवळपास १,५०० दहीहंडी उत्सव मंडळं असून मुंबईसह ठाण्यातील विविध ठिकाणच्या दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पोहोचले. उंच उंच थर लावून काही गोविंदांनी सलामी दिली. गोविंदांचा उत्साह वाढावा यासाठी सेलिब्रिटींनी दहीहंडी उत्सव मंडळांत हजेरी लावल्याने गोविंदांसह मुंबईकरांनी आनंद लुटला. तसेच विविध गाण्यांच्या तालावर गोविंदांसह मुंबईकरही थिरकले.

मुंबईत काळाचौकी, लालबाग, परळ, दादर, वरळी, घाटकोपर, फोर्ट, चेंबूर, जोगेश्वरी आदी ठिकाणी एकावर एक असे चित्तथराराक मानवी मनोरे रचून हंडी फोडण्याचा प्रयत्न झाला. अनेक ठिकाणच्या आयोजकांनी हंडी फोडणाऱ्या गोविंदांसाठी सेफ्टी गियर, जमिनीवर गाद्या, हारनेस आणि रुग्णवाहिकांची सोय केली होती.

दहीहंडी उत्सवाच्या नावाखाली मतदारराजाला आकर्षित करण्यासाठी लाखोंची बक्षिसे देण्यात आली. आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असलेल्या वरळी मतदारसंघात भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी दहीहंडीचे आयोजन केले होते. ठाकरेंचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या वरळीत भाजप आपली पकड घट्ट करत असल्याची चर्चा सुरू होती, तर वरळीतच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी युवा सेनानेते आदित्य ठाकरे, सचिन अहिर आदी ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी हजेरी लावली.

मागाठाण्यात शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी दहीहंडीचे आयोजन केले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावल्याने गोविंदांचा उत्साह द्विगुणित झाला, तर लावणीच्या तालावर ठेका धरणाऱ्या गौतमी पाटील यांच्या उपस्थितीने गोविंदा थिरकले.

दादरची दहीहंडी महिलांनी फोडली

दादर येथील आयडियल दहीहंडी २६ वर्षांपासून आयोजित केली जाते. ही दहीहंडी महिलांच्या पथकांनी फोडली. गल्लोगल्ली छोट्या-मोठ्या दहीहंडी उभारल्या होत्या. त्या फोडण्यासाठी पथकांची चढाओढ सुरू होती. पावसाच्या रिपरिपमध्येही थरावर थर लावत हंडी फोडण्यात आली. शेकडो गाड्यांमधून गोविंदा पथके दहीहंडी फोडत पुढे निघत होते. लाऊडस्पिकर, ढोल-ताशे यांचा दणदणाट गोविंदांचा उत्साह वाढवत होता.

बाइकस्वार गोविंदांना वेगाची झिंग

गोविंदांनी बाइक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर काढल्या होत्या. या बाइक रस्त्यांवर सुसाट धावताना दिसत होत्या. अनेक गोविंदांना वेगाची झिंग चढल्याचे दिसत होते. बाइकस्वारांकडून हेल्मेट वापर केला जात नव्हता. सुरक्षेचे नियम पाळल्याचे दिसत नव्हते. त्यामुळे वाहतूककोंडी झाली होती.

शहरात दुखापत झालेले गोविंदा -

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे.

कु. अनिकेत अनिल मेंढकर (पु./ वय- वर्षे/ राहणार- चिराग नगर, ठाणे.)

कु. अक्षय कडू (पु./ वय-२५ वर्षे)

कु. नरेंद्र धामनराव वाल्मिक (पु./ वय- वर्षे/ राहणार- मुलुंड पूर्व)

कु. पीयूष पी. लाला (पु./ वय- १८ वर्षे/ राहणार- बी. आर. नगर, दिवा.)

कु. सोमनाथ सुभाष सूर्यवंशी (पु./ वय-२७ वर्षे)

कु. केदार पवार (पु./ वय-२८ वर्षे)

कु. गौरव विष्णू चौधरी (पु./ वय- २० वर्षे)

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in