मुंबईतच हेल्मेटसक्ती का? पोलिसांच्या कारवाईबाबत दुचाकीस्वारांची तीव्र नाराजी

मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभाग मुख्यालयातून २५ मे रोजी एक प्रसिध्दपत्रक जारी करण्यात आले.
मुंबईतच हेल्मेटसक्ती का?  पोलिसांच्या कारवाईबाबत दुचाकीस्वारांची तीव्र नाराजी

सहप्रवाशासाठी हेल्मेटसक्तीची दिलेली १५ दिवसांची मुदत संपताच ९ जूनपासून मुंबईत वाहतूक पोलिसांनी नियम मोडणाऱ्या दुचाकीस्वारांवर धडक कारवाई सुरू केली. तब्ब्ल दोन आठवडे सलग सुरु असलेल्या कारवाईत प्रतिदिन ६ ते ७ हजार हेल्मेट परिधान न केलेल्या दुचाकीस्वार आणि सहप्रवाशाकडून दंड वसूल करण्यात येत आहे. दरम्यान, हेल्मेट परिधान न केल्याने अपघाती मृत्यू झालेल्यांचे प्रमाण मुंबईच्या तुलनेत राज्यातील अन्य जिल्ह्यांत अधिक असल्याची स्पष्टोक्ती वाहतूक पोलिसांकडून वेळोवेळी देण्यात येत असताना मुंबई शहरातच नियमांची कठोर अंमलबजावणी का? मुंबईतच हेल्मेटसक्ती का? असा सवाल दुचाकीस्वारांकडून उपस्थित करण्यात येत असून वाहतूक पोलिसांच्या कारवाईबाबत दुचाकीस्वारांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभाग मुख्यालयातून २५ मे रोजी एक प्रसिध्दपत्रक जारी करण्यात आले. अवघ्या काही सेकंदातच सोशल मीडियाद्वारे हे पत्रक वाऱ्यासारखे सर्वत्र पसरले. यामध्ये मुंबईमध्ये अनेक दुचाकीस्वार हे विनाहेल्मेट दुचाकी चालवतात. तसेच दुचाकीस्वाराच्या मागे बसलेली व्यक्तीही हेल्मेटचा वापर करत नाही. यामुळे दुचाकीस्वार आणि त्याच्या पाठीमागे बसलेल्या सहप्रवाशाने देखील हेल्मेट वापरणे सक्तीचे करण्यात आल्याचा नियम पत्रकात जारी करण्यात आला. यासाठी पोलिसांनी १५ दिवसांची म्हणजेच ९ जूनपर्यंत मुदतही दिली. परंतु दुचाकीस्वारांनी सुरुवातीपासूनच या निर्णयाला विरोध दर्शवत सोशल मीडियाद्वारे या निर्णयाबाबत आपली नापसंती दर्शवण्यास सुरुवात केली. मुंबईकरांनी पोलिसांच्या या निर्णयावर संताप व्यक्त केला. १५ दिवसांचा अल्टिमेटम संपताच मुंबई वाहतूक पोलिसांनी निर्णयाची अंमलबजावणी करत पहिल्याच दिवशी तब्बल ३ हजार ४२१ प्रवाशांवर कारवाईचा बडगा उगारला. यांनतर आजतागायत प्रतिदिन ६ ते ७ हजार दुचाकीस्वार- सहप्रवाशांवर कारवाई होत आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in