मेट्रोमधून मासे वाहतूक करण्यास मनाई का? प्रवाशांचा मेट्रो प्रशासनाला सवाल

सोशल मीडियावर मेट्रो प्रशासनाविरोधात नेटकऱ्यांची जोरदार टीका सुरू असून ‘मुंबई आणि मासे अर्थात मांसाहार याला वेगळे करणे म्हणजे अन्याय’ असल्याचे नेटकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे
मेट्रोमधून मासे वाहतूक करण्यास मनाई का? प्रवाशांचा मेट्रो प्रशासनाला सवाल

वाहतुकीचे जाळे वाढवण्यासाठी शासनाकडून विविध प्रकल्प मार्गी लावले जात आहेत. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेट्रो २ अ आणि ७ लोकार्पण करत प्रवाशांच्या सुविधेत आणखी भर पाडली. मात्र या मेट्रोतून प्रवास करताना ‘मेट्रोमध्ये मासे किंवा इतर मृत पशूंसोबत प्रवास केल्यास दंड लागू होईल’ अशाप्रकारच्या डब्यात लावण्यात आलेल्या पोस्टरमुळे प्रवाशांमध्ये चांगलीच नाराजी पसरली आहे. याबाबत सोशल मीडियावर मेट्रो प्रशासनाविरोधात नेटकऱ्यांची जोरदार टीका सुरू असून ‘मुंबई आणि मासे अर्थात मांसाहार याला वेगळे करणे म्हणजे अन्याय’ असल्याचे नेटकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

मुंबईची लाईफलाईन असलेल्या रेल्वेमधून लाखो प्रवासी प्रतिदिन प्रवास करतात. अशातच रेल्वेसोबत मेट्रो वाहतुकीचे जाळे मुंबईसह अन्य शहरात वाढल्याने चाकरमान्यांच्या वेळेत आणि त्रासात चांगलीच बचत झाली आहे. मुंबई मेट्रोचा प्रवास सुखाचा असल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात येते. मात्र दुसऱ्या बाजूला रेल्वे असो अथवा मेट्रो नियमांच्या चौकटीत प्रवास करणे प्रवाशांना बंधनकारक आहे. परंतु मेट्रोमधून प्राव्हसी करताना ‘मेट्रोमध्ये मासे किंवा इतर मृत पशूंसोबत प्रवास केल्यास दंड लागू होईल’ अशाप्रकारच्या डब्यात लावण्यात आलेल्या पोस्टरमुळे प्रवाशांमध्ये चांगलीच नाराजी पसरली आहे.

रेल्वेमधून लहान व्यवसाय करणाऱ्या प्रवाशापासून मोठा व्यवसाय करणारा व्यावसायिक तसेच नोकरदार प्रवास करतो. समुद्रसंपत्ती लाभलेल्या मुंबई शहरात कोळी समाजाचे योगदान आणि प्रमाण मोठी आहे. मुंबईहून विविध शहरात मासेमारी, मासे खरेदी -विक्री करण्यासाठी प्रतिदिन प्रवासी आपल्या माशांचे टोपले, जाळ्या घेऊन प्राव्हसी करतात. परंतु मेट्रोमध्ये मासे किंवा इतर मृत पशूंसोबत प्रवास केल्यास दंड लागू केला जाईल, अशी धमकीपर सूचना प्रवाशांच्या पचनी पडत नसून मुंबई आणि मासे अर्थात मांसाहार याला वेगळे करणे म्हणजे अन्यायच. मासे, सुखी मासळी अत्यंत प्रिय असणारी, पकडणारी, विकणारी, खाणारी अनेक जण रोजच्या गर्दीत असतात. काही वर्षांपूर्वी मेट्रोमध्ये मांस-मच्छी घेऊन प्रवास करणे बेकायदेशीर असल्याचे सांगत एका तरुणाला डब्यात मासे असल्याने मेट्रोत प्रवेश नाकारण्यात आल्याची घटना घडली होती. मनसेतर्फे याविरोधात आंदोलन देखील करण्यात आले होते. मात्र याला केराची टोपली दाखवत आजही मेट्रोच्या डब्यात मासे अथवा पशूंसोबत प्रवास केल्यास दंड लागू होईल, असे पोस्टर्स सर्रास लावण्यात आले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in