प्रत्येक प्रकल्प गुजरातलाच का जातो - राज ठाकरे

जर प्रकल्प आसामला गेला असता तर वाईट वाटले नसते. मी मागे पण म्हणालो होतो की, पंतप्रधान संपूर्ण देशाचे हवे, गुजरातचे नाही
प्रत्येक प्रकल्प गुजरातलाच का जातो - राज ठाकरे
ANI

प्रत्येक प्रकल्प गुजरातला का जातोय, जर प्रकल्प आसामला गेला असता तर वाईट वाटले नसते. मी मागे पण म्हणालो होतो की, पंतप्रधान संपूर्ण देशाचे हवे, गुजरातचे नाही, नरेंद्र मोदी यांनी त्यांवर लक्ष द्यावे, असे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातमध्ये जात असल्याचे प्रकरणी म्हटले आहे.

गुजरातला प्रकल्प जातात कसे?

राज ठाकरे म्हणाले की, प्रकल्प बाहेर गेला म्हणजे कुठे गेला गुजरातला गेला. पंतप्रधानासाठी प्रत्येक राज्य समान मुलांसारखे असायला हवे. जर महाराष्ट्रातील प्रकल्प आसामला गेला असता तर वाईट वाटले नसते. मात्र सर्वच प्रकल्प गुजरातला जात आहे, यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घालायला हवे. मग राज ठाकरे यांनी जर महाराष्ट्राचा विचार केला तर तो संकुचित कसा असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

इतर राज्यावर ओझे नको

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी विशाल विचार केला पाहिजे. प्रत्येक राज्यात विकास झाला पाहिजे, प्रत्येक राज्य मोठे झाले पाहिजे. लोकांना आपले राज्य सोडून दुसऱ्या राज्यात जावे लागण्याची गरज भासली पाही पाहिजे. त्या त्या राज्यातील लोकांना त्यांच्या राज्यात जर रोजगार मिळाला तर ते इतर राज्यांवर ओझे होणार नाही, असे सांगतानाच महाराष्ट्र हे उद्योगांच्या बाबतीत इतर राज्यांपेक्षा खूप पुढे आहे. महाराष्ट्र नेहमीच प्रगती पथावर आहे, उद्योगपतींना महाराष्ट्र जास्त सोयीस्कर ठरले आहे. प्रकल्पांना सगळे राजकारण म्हणून न पाहता केवळ विकास म्हणून पाहायला हवे.

महाराष्ट्र हा उद्योगांच्या बाबतीत अग्रेसर आहे. प्रत्येक उद्योगपतींना महाराश्ट्रात सर्व सोयी सुविधा मिळत आहे. मात्र पंतप्रधानांनी एकाच राज्याचा विचार न करता सर्व देशाचा विचारद करावा असेही राज ठाकरेंनी म्हटले आहे.

राज ठाकरेंचा कोकण दौरा

आगामी 28 तारखेपासून मी कोकण दौऱ्यावर जाणार आहे, अशी माहिती देखील मनसे प्रमुख राज ठाकरेंनी दिली आहे. या दौऱ्याआधी कोल्हापुरात जाऊन महालक्ष्मीचे दर्शन घेणार असल्याचेही राज ठाकरेंनी सांगितले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in